Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:08 PM2024-11-05T15:08:18+5:302024-11-05T15:13:45+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticized the Mahayuti government in Kolhapur | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली आहे. सकाळी उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून के.पी. पाटील निवडणूक लढवत आहेत. आज त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राधानगरी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरातून विधानसभेचे रणशिंग फुंकले. यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेच्यावेळी मी भाषणाची सुरुवात देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत होतो. दसरा मेळाव्यात मी हिंदू बांधवांनो अशी करतो, पण, आताची ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी आहे, अशी टीका ठाकरे यांनी महायुतीवर केली. 

महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान

"कोल्हापुरातून प्रचाराची सुरुवात करत आहे. हा राधानगरी मतदारसंघत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडून मागच्यावेळी चूक झाली होती. सगळ काही देऊनसुद्धा यांनी गद्दारी केली, सगळ देऊनही शिवसेना या नावाच्या आईवरती वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का?, असा सवाल करत ठाकरे यांनी प्रकाश आबिटकर यांच्यावर निशाणा साधला. 

पाच मोठी आश्वासन दिली

१. राज्यातील विद्यार्थीनींना मोफत शिक्षण दिले जाते, महाविकास आघाडीचे सरकार आले तर विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिले जाईल.

२.  महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.

३. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे.

४.आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ.

५.जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेत माजी मंत्री सतेज पाटील यांना जवळ बोलावून आपल्यासोबत सतेज पाटील आहेत असं म्हणाले. ठाकरे म्हणाले, या मतदारसंघाच्या विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्यावरच टाकत आहे. 

"आपल्याला अजूनही न्यायालयाकडून न्याय मिळालेला नाही. डोळ्यावरची फक्त पट्टी काढली आहे. मी महाराष्ट्रासाठी लढत आहे. माझ्या रक्तात गद्दारी नाही, मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम करणार नाही',असंही ठाकरे म्हणाले. 

"निवडणुका जवळ आल्या की हिंदू-मुस्लिम करायचे. हिंदूंमध्ये भेदभाव करायचा, मराठी माणसांमध्ये भेदभाव करायचा. तोडायचे फोडायचे तरीही मला सत्ता मिळाली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले. 

"मला के.पी. पाटलांनी इथलं पाणी अदानींना विकल्याचं सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. मला वाटत होतम फक्त मुंबई अदानींना विकलं की काय, आता पाणी, चंद्रपुरातील शाळा अदानींना विकली जाते. महाराष्ट्रातील सगळं अदानींना विकलं जातंय मग आम्ही काय फक्त बघत बसायचं, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

"महाराजांचा पुतळा उभा केला, त्या पुतळ्यातील पैसे खाणारी लोक महाराष्ट्र पुढं घेऊन जातील असं वाटत आहे का? महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांचा साधा भाजपावाल्यांनी अपमानही केला नाही, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आम्ही महाविकास आघाडीचे सरकार आणणारच. 

महाविकास आघाडीचे सरकार आणल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारणार अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी सुरतमध्येही महाराजांचं मंदीर बांधून दाखवेन, असंही ठाकरे म्हणाले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticized the Mahayuti government in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.