कोल्हापूर महापालिकेतर्फे महात्मा गांधी ,लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी-राबविली स्वच्छता मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:56 PM2018-10-02T12:56:46+5:302018-10-02T13:02:30+5:30

अहिंसावादी तत्वज्ञानाचे पुरस्कार करुन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे साजरी करण्यात आली.

Mahatma Gandhi Jayanti - Lalabahadur Shastri Jubilee Celebration by Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महापालिकेतर्फे महात्मा गांधी ,लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी-राबविली स्वच्छता मोहिम

कोल्हापूर महापालिकेतर्फे महात्मा गांधी ,लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी-राबविली स्वच्छता मोहिम

googlenewsNext

कोल्हापूर : अहिंसावादी तत्वज्ञानाचे पुरस्कार करुन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी वरुणतिर्थ वेश गांधी मैदान येथील महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळयास महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, उप महापौर महेश सावंत, स्थायी समिती सभापती सभापती आशिष ढवळे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उप-आयुक्त मंगेश शिंदे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुनिल भाईक, अशोकराव साळोखे, चंद्रकांत यादव, लालासाहेब गायकवाड, संजय नागरगोजे, अनिरुध्द कोरडे, शरद तांबट, बापू मकानदार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


 महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे वरुणतिर्थ गांधी मैदान येथील महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर शोभा बोंद्रे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयुक्त अभिजित चौधरी, श्रीधर पाटणकर, मंगेश शिंदे, अशोक जाधव आदी उपस्थित होते.


लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी
कोल्हापूर : जय जवान जय किसान असा नारा देत देशातील कृषी क्षेत्रास चालना देणारे माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने मंगळवारी सकाळी शास्त्रीनगर येथील लालबहाद्दुर शास्त्री यांच्या पुतळयास महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी स्थायी समिती सभापती सभापती आशिष ढवळे, उप-आयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, प्रभारी जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. महापौर शोभा बोंद्रे यांनी शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आशिष ढवळे, मंगेश जाधव, नेत्रदिप सरनोबत उपस्थित होते.


अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम -स्वच्छता हीच सेवा या अभियानाअंतर्गत महालक्ष्मी मंदीर परिसराची स्वच्छता

कोल्हापूर : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला १५० व्या जयंती निमित्त ‘स्वच्छता हिच सेवा’ या उपक्रमांतर्गत मंगळवारी सकाळी कोल्हापूर महानगरपालिका आणि विविध सेवाभावी संस्थांच्यावतीने अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेची सुरवात महापौर शोभा बोंद्रे यांनी स्वत: झाडू हातात घेऊन स्वच्छता करुन केली.

महात्मा गांधी यांच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत असून याचे औचित्य साधत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ‘स्वच्छता हिच सेवा’ हे अभियान राबविणेचा संकल्प केला होता. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूर महानगरपालिके तर्फे शहरात कृती अराखडा तयार करुन स्वच्छता हिच सेवा या उपक्रमाची प्रभावी पणे अम्मलबजावणी करण्यात आली.

यामध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, प्रेक्षणीस स्थळे, मुख्य रस्ते, सार्वजनिक शौचालय, भाजी मार्केट इत्यादी ठिकाणी नागरीक, सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालय इत्यादीच्या समन्वयाने स्वच्छता मोहिम राबविणेत आली.

या मोहिमेची सांगता मंगळवारी झाली. सकाळी अंबाबाई मंदीर परिसरामध्ये महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उप-आयुक्त मंगेश शिंदे, नगरसेवक ईश्वर परमार, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, प्रजापिता ब्रम्हाकुमारीचे स्वयंसेवक, विद्यापीठ हायस्कूलचे विद्यार्थी-विद्याथीर्नी, डी. डी. शिंदे कॉलेजचे विद्यार्थी - विद्याथीर्नी, एन. सी. सी. चे विद्यार्थी-विद्याथीर्नी, सामाजिक संस्था व नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. महापौर शोभा बोंद्रे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली.

Web Title: Mahatma Gandhi Jayanti - Lalabahadur Shastri Jubilee Celebration by Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.