Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:24 AM2023-05-02T10:24:12+5:302023-05-02T10:34:28+5:30

Mahatma Gandhi's grandson Arun Gandhi passed away अवनि संस्थेसोबत जवळपास वीस वर्षांचा सहवास. 

Mahatma Gandhi's grandson Arun Gandhi passed away | Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

googlenewsNext

कोल्हापूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू  Arun Gandhi Passes Away अरुण गांधी  यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कोल्हापुरातील अवनि (अन्न वस्त्र निवारा ) संस्थेच्या बालगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अरुण गांधी यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. अमेरीकेमध्ये महात्मा गांधीच्या विचाराचा प्रसार करण्याबरोबर महात्मा गांधींच्या विचारानुसार काम करणाऱ्या जगभरातील कामाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्य त्यांनी तहहयात केले. 

अवनि संस्थेसोबत जवळपास वीस वर्षांचा सहवास 

अवनि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरूण चव्हाण हे त्यांचे परम मित्र. दोन्ही मित्र समाजातील वंचित वर्गासाठी तळमळीने व निस्वार्थपणे झटणार, तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणारे. संस्थेचे कार्य जवळून अनुभवल्यानंतर संस्थेला नेहमीच त्यांनी सर्वतोपरी मदत केली. संस्थेच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांना त्यांच्या मदतीमुळे मोठे बळ मिळाले. बालगृह ईमारतीसाठी जागा घेण्यापासून ते ईमारत ऊभी करेपर्यंत व आजअखेर त्यांचे पाठबळ, त्यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद कायम राहीले. 

दरवर्षी डिसेंबरमध्ये अमेरीकेहून महात्मा गांधींच्या विचाराने भारतात चालणाऱ्या कामाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ते अभ्यास दौरा आयोजित करत. कोल्हापूरमध्ये अवनि संस्थेच्या कार्याला प्रत्यक्ष फील्ड व्हीजिट होत. अध्यक्षा अनुराधा भोसले यांचे प्रचंड काम बघून त्यांना प्रचंड अभिमान वाटे. आपली मदत योग्य पद्धतीने व योग्य ठीकाणी पोचते व त्यातून वंचित वर्गाची होणारी प्रगती बघून परत जाताना एक आत्मिक समाधान घेऊन ते जात. या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे डिसेंबरमध्ये डेलिगेशनसोबत त्यांना येणे शक्य झाले नाही. पण, नातवाच्या एंगेजमेंट निमित्ताने मुंबईला आल्यानंतर अवनिमध्ये एक आठवड्यासाठी आवर्जून आले. परत निघण्याच्या आदले दिवशी प्रकृती बिघडल्याने हॅास्पिटलमध्ये रहावं लागले. त्यातून बरे झाल्यानंतर प्रवास शक्य नसल्याने कोल्हापूरमध्ये राहण भाग होत. 

संस्थेतील अनुराधा मॅडम सोबत फक्त व्यावहारीक औपचारीकपणा नव्हता तर एक वडील- मुलीच आपुलकीचं नात होत. बालगृहातील मुलींचा ऊत्साह, प्रेम व आपुलकीनं काळजी घेण आप्पाजींना एक वेगळाच ऊर्जा देऊन जात होत. स्कॅाट सर्वच बाबतीत अगदिच काटेकोर असल्यांने कोणतीच काळजी नव्हती. अवनिचे कार्यकर्ते सर्व परीवार त्याची काळजी घेत होता व त्यांचे मोलाचे मार्गदर्शही. त्यामुळे त्यांनी ईथला प्रत्येक क्षण आनंदात घालवला. त्यातही तुषारभाईंनी त्यांच्या ईच्छे प्रमाणे सर्व काही व्हावे याची काळजी घेतली. 

आम्हा कुटुंबियांना घरी एक दिवसासाठी  का होईना पण त्यांचा पाहूणचार करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सोबत छान गप्पा मारता आल्या त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळणं हे भाग्यच, त्यांनी दिलेल्या मार्गाने काम करण्याचा प्रयत्न करण हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल, अशा शब्दात त्यांचे अनुयायी गांधी विचारक संजय पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

Read in English

Web Title: Mahatma Gandhi's grandson Arun Gandhi passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.