‘लोकमत’ची महाबचत योजना

By Admin | Published: January 8, 2015 12:31 AM2015-01-08T00:31:00+5:302015-01-08T00:38:40+5:30

दरमहा ७० रुपयांत अंक; मिळवा २५० व ५५० रुपयांच्या आकर्षक भेटवस्तू

'Mahatmachta Yojna' of 'Lokmat' | ‘लोकमत’ची महाबचत योजना

‘लोकमत’ची महाबचत योजना

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून कोल्हापुरातील प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत जागल्याची भूमिका ‘लोकमत’ बजावीत आहे. ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. ‘लोकमत’ने वाचकांसाठी कोल्हापूर शहरात यावर्षी ‘महाबचत’ योजना आणली आहे. त्याअंतर्गत ‘लोकमत’साठी नोंदणी सुरू झाली आहे. मागील वर्षीही ‘लोकमत’ने ही योजना राबविली होती. वाचकांच्या आग्रहानुसार यावर्षी ती ‘महाबचत’ या नव्या स्वरूपात आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोनशे रुपयांचा चेक (धनादेश) अथवा रोख रक्कम देऊन वाचकांना एक वर्षासाठी ‘लोकमत’च्या अंकाची नोंदणी करता येणार आहे. अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करावा. नोंदणी केल्यानंतर लगेचच २५० रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. त्यानंतर दरमहा केवळ ७० रुपये बिलाच्या स्वरूपात वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्यावे लागणार आहेत. आठव्या महिन्यानंतर ५५० रुपयांची हमखास भेटवस्तू मिळणार आहे. योजना कोल्हापूर शहर आणि उपनगरांसाठी मर्यादित आहे.
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. थेट पाईपलाईन, हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, आदी प्रश्नांवर ‘आता बस्स’च्या माध्यमातून त्याने लोकप्रतिनिधी, शासनाला हादरवून सोडले. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. यांतील बहुतांश प्रश्नांवर कार्यवाही सुरू झाली. काहींची सोडवणूक झाली. बातम्यांसह सखी मंच, युवा मंच आणि बाल मंचच्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबविते. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चे वाचक होण्यासाठी अंकाची नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन केले आहे.


वाचकांना १२०० रुपयांचा मोठा फायदा
१योजनेअंतर्गत वाचकांनी अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने अथवा रोख स्वरूपात रक्कम आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे अथवा ‘लोकमत’ कार्यालयात द्यावयाची. त्यानंतर दरमहा ७० रुपये वृत्तपत्र विक्रेत्याला द्यायचे.
२नोंदणीनंतर ‘लोकमत’ वर्षभर १४४० रुपयांचे अंक, तसेच २५० रुपयांची पहिली भेटवस्तू आणि आठ महिन्यांनंतर ५५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू देणार आहे.
३वाचकांना नोंदणीसाठी एका वर्षासाठी दोनशे रुपये व दरमहा ७० असे एकूण १०४० रुपये द्यावे लागणार आहेत. त्या बदल्यात एकूण ८०० रुपयांच्या दोन भेटवस्तू आणि १४४० रुपयांचा अंक वर्षभर मिळणार आहे.
४यात वाचकांचा १२०० रुपयांचा मोठा फायदा होणार आहे.


माहितीसाठी संपर्क
योजनेची अधिक माहिती आणि अंकाच्या नोंदणीसाठी ९८५०३८८३८४, ९९२२९१९४५३, ९९२२९१९४३९ अथवा (०२३०) २४६९४०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.


हे लक्षात घ्या
अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करावा.
योजना कोल्हापूर शहर व उपनगरांसाठी मर्यादित
रोख रक्कम देऊनही नोंदणी करण्याची सुविधा.

Web Title: 'Mahatmachta Yojna' of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.