हळदी येथे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:50+5:302021-01-09T04:19:50+5:30
राजकीयदृष्ट्या सतत चर्चेत राहणाऱ्या हळदी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ जागांसाठी ३२ उमदेवार रिंगणात उतरले असून निवडणुकीत ‘भाजप ...
राजकीयदृष्ट्या सतत चर्चेत राहणाऱ्या हळदी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ जागांसाठी ३२ उमदेवार रिंगणात उतरले असून निवडणुकीत ‘भाजप विरुद्ध महाविकास आघाडी’ अशी दुरंगी लढत होत असून १० उमेदवारांनी बंडखोरी केल्याने दोघांचीही डोकेदुखी बनल्याने भारतीय जनता पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष हंबीराव पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शंकर पाटील, सचिन पाटील यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
हळदी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीवर मागील निवडणुकीत हंबीराव पाटील गटाचे चार तर आघाडीचे सात उमेदवार निवडून आणून एकहाती सत्ता मिळविली तर सत्ता आघाडीची तर सरपंच हंबीराव पाटील गटाचा झाल्याने विकासकामे करत असताना वर्चस्वातून विकासकामाला खिळ बसली. यामध्ये हंबीराव पाटील गटाचा एक
सदस्य अपात्र झाला व पुन्हा एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत हंबीराव पाटील गटाने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. हंबीराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपकडून ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहणे हे त्याच्यासाठी महत्त्वाचे बनले आहे. भाजपबरोबर शेतकरी संघटनेचे संभाजी मगदूम व शिवसेनेचा एक निवास पाटील तर काँग्रेस, शेकाप, अन्य एक शिवसेनेचा एक गट निवडणुकीत राहणार आहे. महाविकास आघाडीचे नेत्तृत्व सर्जेराव पाटील, शंकर पाटील, सचिन पाटील, रोहित साठे, बाबासाहेब पाटील करत आहेत. या निवडणुकीत हंबीराव पाटील यांचे बंधू बाजीराव पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे सर्जेराव पाटील व शंकर पाटील निवडणूक रिंगणात उतरले असून यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असल्याने भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या निवडणुकीत कस लागणार असल्याने या भाजप विरोधातील महाविकास आघाडीच्या लढतीकडे भोगावती परिसराचे
लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
या निवडणुकीत विश्वास पाटील, संभाजी देसाई, महावीर क्षीरसागर, निवास चव्हाण हे बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उभे आहेत.