वसगडे, चिंचवाड येथे महावीर जयंती साध्या पद्धतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:29+5:302021-04-26T04:20:29+5:30
वसगडे येथील प्रसिद्ध जैन मंदिरात श्री आचार्य १०८ गंधराचार्य कुंतूसागर महाराज व आचार्य श्री १०८ गुणनंदी महाराज यांचे शिष्य ...
वसगडे येथील प्रसिद्ध जैन मंदिरात श्री आचार्य १०८ गंधराचार्य कुंतूसागर महाराज व आचार्य श्री १०८ गुणनंदी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री १०८ गुणभद्र नंदी मुनीश्वर यांच्या हस्ते व १०५ आदिष्री दीप्तीश्री माताजी यांच्या उपस्थितीत भगवान महावीर यांच्या मूर्तीस पंचामृत जलाभिषेक करण्यात आला.
गावातील मोजक्याच श्रावक, श्राविका व भाविक यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा संपन्न झाला. जैन दिगंबर समाज कमिटीचे मानकरी या सोहळ्यास उपस्थित होते. दरवर्षी होणारा मोठा उत्सव कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, चिंचवाड (ता. करवीर) येथील जुन्या व नवीन आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात स्थानिक पंडित यांच्या हस्ते श्री भगवान महावीर यांच्या मूर्तीस पंचामृत जलाभिषेक व नामकरण सोहळा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या हस्ते श्रावण-श्राविका यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव पार पडला.
चौकट :- भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून वसगडे गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जयपाल बाबू गिरमल यांनी डिग्रज (ता. मिरज) येथील आचार्य श्री १०८ वर्धमान सागर महाराज यांच्या उपस्थितीत मुनि दीक्षा ग्रहण केली त्यानुसार त्यांना सिद्ध सागर मुनी महाराज असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.
फोटो ओळ : वसगडे (ता. करवीर) येथील जैन मंदिरांमध्ये भगवान महावीर जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी श्रावक, जैन समाजाचे अध्यक्ष डी. एस. पाटील, डॉ. श्रीकांत चौगुले, महावीर चौगुले, सुनील पाटील, सेवकरी विजय पाटील (छाया : बाबासाहेब नेर्ले).