कोल्हापूर जिल्ह्यातील ६६ कर्मचाऱ्यांच्या पाठीवर महावितरणची कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:40 PM2019-05-04T15:40:17+5:302019-05-04T15:42:04+5:30
महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणने जिल्ह्यात उत्कृष्ठ काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ५५ उत्कृष्ठ तारमार्ग व ११यंत्रचालक अशा ६६ जणांना पुरस्काराने परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
कोल्हापूर: महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणने जिल्ह्यात उत्कृष्ठ काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ५५ उत्कृष्ठ तारमार्ग व ११यंत्रचालक अशा ६६ जणांना पुरस्काराने परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सेवाकाळात जबाबदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दरवर्षी महावितरणकडून गौरव केला जातो. विभागातून एक यंत्रचालक व उपविभागातून एक जनमित्र निवडले जातात. यावर्षी यासाठी ६६ जणांची निवड झाली.
पुरस्कार वितरणानंतर मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी मार्गदर्शन करताना महावितरणचा कर्मचारी प्रत्येक घराशी जोडला गेला असल्याने आपले काम प्रामाणिकपणे आणि सुरक्षितरित्य पार पाडणे हे आपले कर्तव्य समजून अखंडीत सेवा देण्यास सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले.
यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक राजेंद्र रानगे, कार्यकारी अभियंता नरेंद्र ताडे, सागर मारुलकर, सुनील माने, सुनील शिंदे, शिरीष काटकर उपस्थित होते. सुत्रसंचालकन संभाजी कांबळे यांनी केले.