देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:45 IST2018-06-25T19:43:26+5:302018-06-25T19:45:06+5:30

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनाही सोमवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.

Mahesh Jadhav, Chairman of the Devasthan Management Committee, will be the Minister of State for Communications | देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

ठळक मुद्देविधि व न्याय विभागामार्फत जारी शासन निर्णयदेवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची पहिलीच वेळ

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनाही सोमवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.

विधि व न्याय विभागामार्फत सोमवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जाधव यांना हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यमंत्रीपदाला मिळणाऱ्या सर्व सोयी आणि सुविधा जाधव यांनाही मिळणार आहेत.

महेश जाधव यांच्याआधी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.

पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. देवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: Mahesh Jadhav, Chairman of the Devasthan Management Committee, will be the Minister of State for Communications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.