महिला बँकेस ४६.४४ लाख नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:20+5:302021-03-25T04:24:20+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महिला सहकारी बँकेस ४६ लाख ४४ हजार नफा झाला असून, सभासदांसाठी विविध योजना राबविल्याची माहिती बँकेच्या ...
कोल्हापूर : कोल्हापूर महिला सहकारी बँकेस ४६ लाख ४४ हजार नफा झाला असून, सभासदांसाठी विविध योजना राबविल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा शैलजा सूर्यवंशी यांनी सभेत दिली.
बँकेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी बोलताना अध्यक्षा सूर्यवंशी म्हणाल्या, बँकेच्या ८६ कोटींच्या ठेवी व ५२ कोटींची कर्जे आहेत. बँकेने आण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याज परतावा योजना सुरू केली असून, प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रस्तावही पाठविला आहे. खातेदारांनी कर्ज योजना आणि डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बँकेचे महाव्यवस्थापक जे. के. कुंभार यांनी अहवाल वाचन केले. सुवर्णा कदम, सई ढोबळे, कल्पना शिंदे, सुनीता पोवार यांनी कामकाजाबाबत प्रश्न विचारले. उपाध्यक्षा माधुरी शिंदे यांनी आभार मानले. यावेळी संचालिका लतादेवी जाधव, सुनीता डोंगळे, मनीषा दमामे, जानकीदेवी निंबाळकर, तिलोत्तमा भोसले, भारती डोंगळे, सुधा इंदुलकर, मोहिनी घोटणे, मथुराबाई सुतार, जयश्री परमाळे, विजया जाधव, संयोगिता पाटील उपस्थित होत्या.
फोटो ओळी : कोल्हापूर महिला बँकेच्या सभेत अध्यक्षा शैलजा सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालिका उपस्थित होत्या. (फाेटो-२४०३२०२१-कोल-कोल्हापूर महिला बँक)