टेंबलाईवाडी झोपडपट्टी कायम करा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 04:30 PM2020-01-07T16:30:08+5:302020-01-07T16:32:59+5:30
टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टी कायम करावी किंवा पयार्यी जागा देऊन पुनर्वसन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टीधारकांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टी कायम करावी किंवा पयार्यी जागा देऊन पुनर्वसन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टीधारकांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
निवेदनात म्हंटले आहे की, टेंबलाईवाडी येथील सरकारी जमीनीवर झोपड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. दि. 30 नोव्हेंबरला अतिक्रमण कारवाई करून झोपड्या हटविण्यात आल्या. ही जमीन 1979 मध्ये हनुमान सहकारी गृहनिर्माण संस्थेला देण्यात आली होती. पण संस्थेने ताबा घेऊन गृहनिर्माण प्रकल्प उभा केला नसल्याने ही जमीन पुन्हा सरकारने परत घेतली. त्यामुळे या जमिनीवर असलेली झोपडपट्टी गरजू व बेघर गरिबांना द्यावी.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष धनाजी सकटे यांच्यासह अश्विनी नाईक, सुनीता कांबळे, विलास भालेकर, केशव लोखंडे, रेखा कांबळे संभाजी लोखंडे, गीता शिंदे, सुनीता कदम आदी सहभागी झाले आहेत.