पाच तालुक्यांतील रेशन दुकानांत मका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:48+5:302021-03-04T04:46:48+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले व कागल या पाच तालुक्यांमध्ये रेशनवर वाटप करण्यात येणारा मका दुकानांमध्ये दाखल ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले व कागल या पाच तालुक्यांमध्ये रेशनवर वाटप करण्यात येणारा मका दुकानांमध्ये दाखल झाला आहे. या मक्याची किंमत प्रतिकिलो एक रुपये असून, मार्च महिन्यातील धान्य वितरणात एक किलो गव्हाच्या बदल्यात मका देण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत १२ हजार ०७३ क्विंटल मका कोल्हापूर जिल्ह्यास मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत करवीर - ३ हजार २०० क्विंटल, पन्हाळा - १ हजार ७९० क्विंटल, हातकणंगले - २ हजार ९४६ क्विंटल, शिरोळ - २ हजार ४९२ क्विंटल व कागलसाठी १ हजार ६४५ क्विंटल याप्रमाणे तालुक्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थींना मक्याचे वाटप करण्यात येणार आहे. योजनेच्या प्रती लाभार्थी १ किलो गहू कमी करून त्याऐवजी १ किलो मक्याचे वाटप या महिन्यात करण्यात येत आहे.
-------