नृसिंहवाडीला महापूराने ऊसाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 07:01 PM2021-08-05T19:01:18+5:302021-08-05T19:05:55+5:30
Flood Rain Kolhapur : जुलैमधील महापुरामुळे गावातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथली दत्तमंदिर, मिठाई दुकानदार, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी मिठाई व्यापाऱ्यांचे फर्निचरचे पाण्यात बूडून नुकसान झाले आहे.
दीपक जाधव
कोल्हापूर : जुलैमधील महापुरामुळे गावातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथली दत्तमंदिर, मिठाई दुकानदार, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी मिठाई व्यापाऱ्यांचे फर्निचरचे पाण्यात बूडून नुकसान झाले आहे.
या महापुरात व्यापाऱ्यांचे सुमारे सहा ते सात कोटीचे नुकसान झाले आहे. सध्या दत्त मंदिरात पाणी असून नुकसानीचा अंदाज लावता येत नसला तरी सध्यस्थितीत देवस्थानचे कार्यालय वेदपाठशाळा व इतर असे मिळून अंदाजे ५०-६० लाखाचे नुकसान झाले आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक महापुराचा फटका बसणारे गाव म्हणजे नृसिहवाडी. या गावाला महापूर काळात बेटाचे स्वरूप येते. दत्तात्रयाची भूमी गेले तीन वर्षे संकटाशी सामना करत असुन यावर्षी २००५ व २०१९ च्या तुलनेत कमी नुकसान झाले आहे.
पूर्वेला कृष्णा नदी तर दक्षिण व पश्चिमेकडून पंचगंगा नदीने गावाला वळसा घातला असून तिन्ही बाजुने गावाला पाणी वेढते. हे गाव कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसले असून लोकसंख्या ४१६८ तर गावात ६५७ पशुधन आहे.
यातील शंभर टक्के लोक व पशुधन स्थलांतरित करण्यात आले होते. गावचे एकुण क्षेत्रफळ ४१८ हेक्टर आहे तर २१ हेक्टर गावठाण असून प्रमुख पिक हे ऊस आहे. संपूर्ण क्षेत्र हे पाण्याखाली गेले होते.
गावातील १० ते १५ घराची पडझड झाली असून २०१९ पेक्षा यावर्षी प्रशासनाने दिलेल्या पूर्व सुचने मुळे गावातील लोकांनी पाणी वाढेल तसे स्थलांतर केल्या मुळे नुकसान कमी झाले आहे. २०१९ मध्ये प्रशासनाने ५-६ कोटी ची मदत या गावात केली होती. त्यातुलनेत यावर्षीचे नुकसान कमी झाले आहे.
गाव १००% पूरग्रस्त झाले होते.२०१९ च्या तुलनेत यावर्षी प्रशासनाकडून मिळालेल्या सुचना मुळे गावकरी सावध होऊन स्थलांतरित झाले.सर्वाधीक नुकसान हे शेतीचे झाले असून सध्या ९९% गाव स्वच्छ झाले आहे यासाठी जिल्हापरिषद, पिपंरी-चिचवड महापालिका, शरद साखर कारखान्याने मोलाची मदत केली. जनावरांचा चारा व अग्निशमन शरद साखर कारखान्याने उपलब्ध करून दिला.तसेच लोकांची रहाण्याची सोय दत्त कारखान्याने केली होती.
-पार्वती कुंभार, सरपंच.
२०१९ चा महापुर,२०-२१ चा कोरोना व आता महापूराने देवस्थानचे नुकसान झाले आहे. मंदिराची रंगरंगोटी,विद्युत दिवे,अन्नछत्र, वेदपाठ शाळा, ऑफिस फर्निचर याचे नुकसान झाले आहे.
-अमोल पुजारी, देवस्थान विश्वस्त.
यावर्षी बाजारपेठेत १२ फुटांवर पाणी होत.कोरोणा काळात गेले दीड वर्ष दुकान बंद असल्याने नुकसान झाले आहे त्यात या महापुरात व्यापारी व्यापारीवर्गाचे ६-७ कोटीचे नुकसान झाले आहे.
-अनंत धनवडे,
अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन.