मजरे कार्वेत शिक्षकांनी श्रमदानातून केली शाळेची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:06+5:302021-06-24T04:17:06+5:30
यंदाही कोरोना महामारीमुळे शाळा सुरूच झाल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन वर्ग सुरू होते. आपले काम करतच असताना शिक्षकांना ...
यंदाही कोरोना महामारीमुळे शाळा सुरूच झाल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन वर्ग सुरू होते. आपले काम करतच असताना शिक्षकांना पावसाळ्यात आपल्या वर्गांची दुरवस्था आठवली. त्यातून ही संकल्पना पुढे आली. त्याला शालेय शिक्षण समिती अध्यक्ष एम. एम. तुपारे व प्राचार्य एस. एम. कुंभार यांची साथ मिळाल्याने जोर लागला.
शाळेची स्थापना १९५८ मध्ये झाली असून इमारतीला जवळजवळ ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शाळेचा थाट निकामी झाला होता. त्यातच विशेष करून पावसाळ्यात गळतीमुळे त्याचा नाहक त्रास शिक्षक व विद्यार्थ्यांना होत होता. १५ ते २० दिवस रोज आपली जबाबदारी पूर्ण करून शिक्षक श्रमदान करत असत. या काळात त्यांनी ५ हजार स्क्वेअरफूट काम पूर्ण केले. यामध्ये त्यांना शाळेच्या कर्मचाऱ्यांची मदत तर केलीच त्याचबरोबर महिला शिक्षिकांनीही मोलाची साथ दिली. त्यामुळे काम गतीने पूर्ण झाले.
फोटो ओळी : मजरे कारवे (ता. चंदगड) येथील शाळा इमारतीच्या थाटाची दुरुस्ती करताना शिक्षक व कर्मचारी.
क्रमांक : २३०६२०२१-गड-०१