कलाकाराने स्थान निर्माण कराव
By admin | Published: January 30, 2015 12:06 AM2015-01-30T00:06:57+5:302015-01-30T00:15:14+5:30
अलका कुबल : जयसिंगपुरात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटने
जयसिंगपूर : कलाकाराने आपल्या क्षेत्रातील आदर्श जरूर ठेवावेत, पण स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जयसिंगपूरमध्ये राजर्षी शाहू महोत्सवानंतर एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना उमेद देणेचे कार्य ‘आम्ही रसिक’ संस्थेने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेत्री अलका कुबल यांनी केले. येथील राजर्षी शाहू खुले नाट्यगृहात दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट व आम्ही रसिक आयोजित राजर्षी शाहू करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री अलका कुबल बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता खामकर होत्या. यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, उद्योगपती विनोद घोडावत, महेंद्र सावंत, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, परीक्षक भालचंद्र पानसे, शिल्पा सावंत उपस्थित होते.अभिनेत्री कुबल म्हणाल्या, माझ्या उमेदीच्या काळात हौशी व व्यावसायिक नाट्यक्षेत्रात काम केले. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केल्यानंतर रंगभूमीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले, याची मला खंत वाटते. प्रारंभी दीपप्रज्वलन, नटराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत आम्ही रसिक संस्थेचे कार्यवाह स्वरूपा पाटील-यड्रावकर, तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी केले. उद्योगपती दानचंद घोडावत, डॉ. अतिक पटेल, नंदू मिणीयार, स्नेहा शिंदे, संगीता पाटील-कोथळीकर, संभाजी मोरे, युवराज शहा, मधुसूदन मालू, अॅड. संभाजीराजे नाईक, सागर आडगाणे, उल्हास माळगी, रवींद्र ताडे, राजेश मालू, अजित उपाध्ये, बबन यादव, बाळ बरगाले, चेतन चौधरी, शब्दा कुंभार, शिरीष यादव, बी. बी. गुरव, माधुरी चौगुले, जायंट्स अध्यक्षा डॉ. नलीनी पाटील, यांच्यासह नाट्यरसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र
झेले यांनी केले. रमेश यळगुडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
एकांकिका सादर झाल्या
उद्घाटनानंतर दि चेंज, पांढऱ्या घोड्यावरील राजपुत्र, वैकुंठाचा स्वर्ग, एक तू एक मी आणि. . , गेला श्याम्या कुणीकडे, टेम्पल एम्प्लोएमेंट अशा एकांकिका सादर करण्यात आल्या.
१ फेब्रुवारीपर्यंत एकांकिका स्पर्धा होणार आहेत.
जयसिंगपूर येथे गुरुवारी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते झाले. यावेळी विनोद घोडावत, सुनीता खामकर, स्वरूपा पाटील-यड्रावकर, मिलिंद शिंदे, महेंद्र सावंत, संजय पाटील-यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित होते.