मोळी बांधणी वजावट पाच टक्क्यांऐवजी एक टक्के करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:35+5:302020-12-08T04:20:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : एकरकमी एफ.आर.पी.१४ दिवसांत द्यावी, मागील थकीत एफआरपीचे व्याज मिळावे, क्रमपाळीची यादी सर्व कार्यालयात प्रसिद्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : एकरकमी एफ.आर.पी.१४ दिवसांत द्यावी, मागील थकीत एफआरपीचे व्याज मिळावे, क्रमपाळीची यादी सर्व कार्यालयात प्रसिद्ध करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जयशिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुशच्यावतीने येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यास देण्यात आले.
निवेदनात म्हटल्यानुसार, शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ च्या कायद्यानुसार तोड केलेल्या उसाची १४ दिवसांत एकरकमी एफ.आर.पी. जमा करावी, गेल्या वर्षी दोन टप्प्यात एफ.आर.पी. दिली आहे. त्या थकीत एफ.आर.पी.चे १५ टक्क्यांनुसार होणारे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, मशीन तोडीच्या उसास पाच टक्के मोळी बांधणी वजावट शासनाचा अथवा साखर आयुक्तांचा कोणताही आदेश नसताना करीत आहात ती वजावट अन्यायकारक असून, ती रद्द करण्यात यावी. फडातून उसाचे वाहन कारखान्यावर आल्यानंतर आधी वजन करून नंतर नंबरात लावावे, अशा मागण्यांचे निवेदन कार्यकारी संचालक शहाजीराव भगत यांना भेटून दिले. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव माने, जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष बंडा पाटील, उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, हातकणंगले तालुकाध्यक्ष गब्बर पाटील, सदाशिव कुलकर्णी, शीतल कांबळे, तानाजी पाटील, भैरवनाथ मगदूम, राजाराम थोरवत, सचिन कांबळे, आदी उपस्थित होते.
............
संघटनेने शेतकरी हिताच्या केलेल्या मागणीस कार्यकारी संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मशीन तोडीस पाच टक्के मोळी बांधणी वजावट अन्यायकारक असून, ती रद्द करण्यात यावी, असे शिवाजी माने यांनी सांगितले.
फोटो ओळ ०७ निवेदन
- वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष शिवाजी माने, धनाजी पाटील, गब्बर पाटील, सदाशिव कुलकर्णी, शीतल कांबळे, तानाजी पाटील, बंडा पाटील, आदी उपस्थित होते.