महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:59 PM2024-07-02T12:59:06+5:302024-07-02T13:00:13+5:30

सकारात्मक निर्णय घेण्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

Make Mahatma Phule Jan Arogya Yojana comprehensive, MLA Satej Patil demand in Legislative Council | महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी 

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी 

कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. खासगी आणि धर्मादाय रुग्णालयातदेखील या योजनेंतर्गत उपचार करण्यात यावेत. याशिवाय किडनीसह इतर खर्चिक उपचारासाठी, जादा रक्कमेची तरतूद करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली.

आमदार पाटील म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये काही आजारांसाठी केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये करण्यात येणारे उपचार या योजनेमध्ये समाविष्ट करा.

या योजनेमध्ये समाविष्ट काही उपचार महागडे आहेत. किडनीवरील उपचारासाठी सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च येतो. अशा उपचारांसाठी निर्धारीत करण्यात आलेल्या मंजूर रकमेमध्ये वाढ करण्यात यावी, तसेच या योजनेमध्ये ज्या रुग्णालयांचा समावेश नाही. त्यांचा समावेश करण्यासंदर्भातील धोरण सरकारने निश्चित करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. 

यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या योजनेमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये होत असणाऱ्या उपचारांचा समावेश इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयामध्ये करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमून आठ दिवसांत अहवाल घेण्याचे आश्वासन दिले. सरकारी रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री सावंत यांनी दिली.

Web Title: Make Mahatma Phule Jan Arogya Yojana comprehensive, MLA Satej Patil demand in Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.