अपूर्वानगरात पावसाळ्यापूर्वी रस्ते करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:30+5:302021-04-22T04:24:30+5:30
कोल्हापूर : येथील अपूर्वानगरात अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज व पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्यावर अनंत खड्डे पडल्यामुळे ...
कोल्हापूर : येथील अपूर्वानगरात अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज व पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्यावर अनंत खड्डे पडल्यामुळे येथील रहिवाशांना ये-जा करताना कसरत करावी लागते. त्यामुळे महापालिकेने रस्ता त्वरित करून द्यावा, अशी मागणी भागातील नागरिकांतून होत आहे. पर्यायी मार्ग नसल्याने या रस्त्यावर डांबरीकरण अथवा खडी-मुरमाचा दीड इंचाचा थर करून रस्ता सुस्थितीत करून द्यावा. संबंधित अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करून रहिवाशांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मोहिते यांच्या ‘परिपूर्ती ’ आत्मचरित्रास राज्य पुरस्कार
कोल्हापूर : येथील निवृत्त प्रा. गणपती मोहिते यांच्या परिपूर्ती आत्मचरित्रास कै. हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे व राज प्रकाशनतर्फे कोरोना काळातील राज्यस्तरीय उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. लाॅकडाऊन काळात प्रकाशित झालेल्या राज्यस्तरीय साहित्यकृतींना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये प्रा. मोहिते यांच्या परिपूर्ती या आत्मचरित्राचा समावेश आहे. यात गरिबीमुळे अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी केलेला जीवनप्रवास व उत्तरार्धात त्यांना मिळालेले यश या आत्मचरित्रातून विशद केले आहे.
फोटो : २१०४२०२१-कोल-गणपती मोहिते