"मतदार यादी बिनचूक करा, नवमतदारांची संख्या वाढवा"

By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 13, 2023 08:23 PM2023-12-13T20:23:38+5:302023-12-13T20:23:53+5:30

सौरभ राव : मतदार नोंदणी आढावा बैठकीत सूचना.

"Make the voter list accurate, increase the number of new voters" | "मतदार यादी बिनचूक करा, नवमतदारांची संख्या वाढवा"

"मतदार यादी बिनचूक करा, नवमतदारांची संख्या वाढवा"

कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी बिनचूक तयार करा, नाव नोंदणी व नाव वगळणे या दोन्ही बाबींवर काटेकोर लक्ष ठेऊन प्रक्रिया पूर्ण करा. नवमतदारांमध्ये जागृती, प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील आयडॉल व्यक्तींची मदत घ्या अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी राव यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत सुरू असलेल्या जागरुकता अभियानाची माहिती घेतली.

सौरभ राव म्हणाले, नवमतदारांमध्ये जागृती करण्यासाठी जलतरणपटू वीरधवल खाडे, बाळूमामा मालिकेतील अभिनेते सुमीत पुसावळे, शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांचे सहकार्य घ्या. मतदार यादी अधिकाधिक बिनचूक करा. मतदार यादीत नाव घालणे, वगळणे, मयतांची नावे वगळणे, अन्य दुरुस्ती, दुबार मतदारांची एकाच ठिकाणी नोंदणी अशा सर्व अर्जांची निर्गत करा.
 
मतदार यादी दुरुस्तीबाबत आलेले अर्ज : ८६ हजार ८

निर्णय झालेले अर्ज : ३७ हजार २८४
निर्णय प्रक्रियेत असलेले अर्ज : ४७ हजार ६४९
 
एका मोहिमेत १६ हजार नवमतदार

नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहिमा घेतल्या जात आहे. याअंतर्गत झालेल्या पहिल्याच मोहिमेत जिल्ह्यात १६ हजार ५०७ नवमतदारांची नोंदणी झाली आहे.

Web Title: "Make the voter list accurate, increase the number of new voters"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.