महिला पोलिसांना प्रसाधनगृहांची सोय करा : सतिश माथूर

By admin | Published: May 2, 2017 06:33 PM2017-05-02T18:33:31+5:302017-05-02T18:33:31+5:30

परिक्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हा एक चिंतेचा प्रश्न : परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना सूचना

Make toilet facilities for women police: Satish Mathur | महिला पोलिसांना प्रसाधनगृहांची सोय करा : सतिश माथूर

महिला पोलिसांना प्रसाधनगृहांची सोय करा : सतिश माथूर

Next

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0२ : पोलिस दलात काम करणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलिस ठाण्यामध्ये त्यांना स्वतंत्र प्रसाधनगृहे ठेवण्याची सोय करा, अशा सूचना राज्याचे पोलिस महासंचालक सतिश माथूर यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना दिल्या.

वाढती गुन्हेगारी हा एक चिंतेचा प्रश्न आहे. ती मोडीत काढण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून संयुक्तरीत्या कारवाईची मोहीम राबवावी, असे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण विभागांतील पोलीस अधीक्षकांची आढावा बैठक मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेण्यात आली.

यावेळी संजय वर्मा यांनी, परिक्षेत्रामध्ये चेन स्नॅॅचिंग, घरफोडीच्या गुन्"ांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्"ांना लागून बेळगाव- कर्नाटकची हद्द आहे. त्यामुळे कर्नाटकातून सहजासहजी गुन्हेगार येथे शिरकाव करू शकतात. त्यामुळे गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून संयुक्तरीत्या कारवाई करावी.

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात कोणत्याही प्रकारे कसूर करू नये. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार करावे; तसेच शांतता-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करून प्रशासनाला उघड आव्हान देणाऱ्यांना अवैध व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी पाच जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Make toilet facilities for women police: Satish Mathur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.