सिनेमा आनंदासाठी बनवते : सुमित्रा भावे, किफ्फमध्ये साधला रसिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:07 PM2017-12-15T13:07:41+5:302017-12-15T13:13:05+5:30

माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या. ​​​​​​​

Makes the cinema for happiness: Sumitra Bhave, Kiffa Dialogues dialogues | सिनेमा आनंदासाठी बनवते : सुमित्रा भावे, किफ्फमध्ये साधला रसिकांशी संवाद

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत सुमित्रा भावे यांनी रसिकांशी संवाद साधला. यावेळी मयूर कुलकर्णी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसिनेमे बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आनंद कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत सुमित्रा भावे यांनी साधला रसिकांशी मुक्त संवाद

कोल्हापूर : माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.

कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत त्यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला. मयूर कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

त्या म्हणाल्या, सिनेमा हे वास्तवातले स्वप्न दाखवताना त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, प्रामाणिकपणा, सहनशीलता, येणारे अडथळे याचे एकत्रित अनुभव देते. जीवन खोलात समजून घेण्यासाठी सिनेमा महत्वाचा असतो. एखादा चित्रपट बनवण्याआधी मी त्या विषयाचा सखोल अभ्यास करते. उगाच मनोरंजन करायचे म्हणून अनावश्यक गोष्टींना आणि प्रसंगांना त्यात थारा नाही. मला हवा तो संदेश आणि मांडणी यात तडजोड करत नाही, मग तो फार कमी लोकांनी पाहिला तरी मला चालतो. पैसा महत्वाचा असला तरी आनंद हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

त्या म्हणाल्या, प्रत्येक कलावंताकडे तिसरा डोळा असतो आणि तो नैतिकतेचा असतो. त्या नजरेतून तूम्ही सामान्य माणसांकडे पाहायला लागलात की त्यांच्यातील असामान्यत्वाची जाणीव होते. आपण नव्याने माणूस समजायला लागतो. मी जगभर फिरले. तेथील जनजीवन, समस्या, चित्रपटांचे विषय जवळून पाहिले अनुभवले, तेथील तंत्रज्ञान शिकले पण त्या सगळ््या संचिताचा उयोग भारतीयत्वाचे चित्रपट बनवण्यासाठी करते. आपण ज्या मातीतून आलो त्या मातीचा आधी शोध घेतला पाहीजे.

 

Web Title: Makes the cinema for happiness: Sumitra Bhave, Kiffa Dialogues dialogues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.