शालेय समितीचे मलिक बागवान अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:43+5:302021-06-11T04:17:43+5:30
कोल्हापूर : मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल शालेय समितीच्या चेअरमनपदी संस्थेचे विद्यमान संचालक मलिक ईलाही बागवान यांची ...
कोल्हापूर : मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल शालेय समितीच्या चेअरमनपदी संस्थेचे विद्यमान संचालक मलिक ईलाही बागवान यांची एकमताने निवड झाली.
निवड झालेल्या अन्य समिती सदस्यांमध्ये लियाकत हाजी कादर मुजावर, रफीक हारुण शेख, जहाँगिर हुसेन अत्तार यांचा समावेश आहे. या निवडीकामी संस्थेचे उपाध्यक्ष आदिल फरास, संस्था चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांचे सहकार्य लाभले.
फोटो : १००६२०२१-कोल-मलिक बागवान
बालकामगार प्रथाविरोधी दिनानिमित्त उद्यापासून कार्यक्रम
कोल्हापूर : अवनीमार्फत जागतिक बालकामगार प्रथाविरोधी दिनाचे आैचित्य साधून १२ ते १८ जून दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये जनजागृती विषयाचे पोस्टर्स प्रदर्शन, परिसंवाद, कोरोना काळात बालकांच्या समस्या, त्यावरील उपाययोजना, ऑनलाइन परिसंवाद, आदींचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कचरावेचक वस्तीतील अवनी संस्थेच्या बाल अधिकार मंचाची मुले, अवनी बालगृहातील मुली यांच्याकरिता निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. हा सप्ताह कोल्हापूरसह सांगली, सातारा या जिल्ह्यांतही साजरा केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांनी दिली.
विवेकानंदच्या छात्रसैनिक मुलींकडून कोरोना योद्ध्यांना मदत
कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयाच्या ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीच्या छात्रसैनिकांकडून सीपीआर रुग्णालयात मोफत नाष्टा पुरविणाऱ्या ड्रीम टिमच्या मुलींना पाच हजारांचे साहित्य दिले. हे साहित्य प्राचार्य डाॅ. आर. आर. कुंभार यांनी हे साहित्य ड्रीम टिमच्या सदस्या व महाविद्यालयीन विद्यार्थिनी अर्पिता राऊत, आंचल कट्यारे, श्रेया चौगुले, श्रृती चौगुले यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी कॅप्टन सुनीता भोसले-दळवी, लेफ्टनंट भरमगौंडा सार्जंट, श्रृती बाम, तेजश्री सांगावकर, विदुला चोपदार, गायत्री तावडे आदी उपस्थित होते. या कार्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, सहसचिव युवराज भोसले, जिमखाना प्रमुख किरण पाटील, शहिदा कच्छी, सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. के. तिवारी, मेजर गुगामालती यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : १००६२०२१-कोल-विवेकानंद काॅलेज
फोटो : विवेकानंद महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रसैनिक मुलींकडून कोरोना योद्धा टिमला साहित्य देऊन मदत करण्यात आली. हे साहित्य प्राचार्य डाॅ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
चौदा वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा
कोल्हापूर : बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ नुसार १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. चौदा ते अठरा वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. अशा बालकांना व किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास २० ते ५० हजारांपर्यंत दंड वा सहा ते २ वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तरी कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनेमध्ये १४ वर्षांखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग प्रक्रियेमध्ये १८ वर्षांखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शाहुपुरी, व्यापारी पेठ यांच्याकडे संर्पक साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.