मलकापूर - ग्रामपंचायत छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:18+5:302021-01-02T04:20:18+5:30

मलकापूर - ग्रामपंचायत छाननी लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर प्रतिनिधी शाहूवाडी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या ३२७ जागांसाठी दाखल झालेल्या ७५९ अर्जांपैकी ...

Malkapur - Gram Panchayat Scrutiny | मलकापूर - ग्रामपंचायत छाननी

मलकापूर - ग्रामपंचायत छाननी

googlenewsNext

मलकापूर - ग्रामपंचायत छाननी

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या ३२७ जागांसाठी दाखल झालेल्या ७५९ अर्जांपैकी ७५० अर्ज वैध, तर नऊ अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार व महसूल नायब तहसीलदार रमेश कुलकर्णी यांनी दिली.

छाननीत अवैध ठरलेल्या ग्रामपंचायतीनिहाय आकडेवारी अशी- आंबा व बुरंबाळ-प्रत्येकी-दोन, नेर्ले व सवते-प्रत्येकी-एक व थेरगाव-तीन या पाच ग्रामपंचायतीच्या नऊ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याचे प्रसाद वडणेरकर यांनी सांगितले.

पेरिड-गाडेवाडी ग्रुप ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा ग्रामस्थांनी राखली आहे. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पेरिड-गाडेवाडी ग्रुप, जांबूर-मालगाव ग्रुप, वारूळ, अणुस्कुरा, वडगाव, सोंडोली व गिरगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी पॅनेलप्रमुखांचे खलबते सुरू झाले आहेत. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Malkapur - Gram Panchayat Scrutiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.