मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:49+5:302021-09-03T04:24:49+5:30
मलकापूर : मलकापूर नगरपरिषदेचे भाजप जनसुराज्य आघाडीचे उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन उपनगराध्यक्ष पदासाठी भारत ...
मलकापूर : मलकापूर नगरपरिषदेचे भाजप जनसुराज्य आघाडीचे उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन उपनगराध्यक्ष पदासाठी भारत गांधी यांचे नाव निश्चित झाले आहे .
मलकापूर नगर परिषदेत भाजप जनसुराज्य दलित महासंघ आघाडीची सत्ता आहे. आघाडीत ठरलेल्या समझोत्यानुसार सत्ता स्थापन झालेल्या कालावधीपासून पहिल्या कालावधीत जनसुराज्यचे दिलीप पाटील, सोनिया शेंडे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार पाहिला होता. त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी उपनगराध्यक्षपद हे भाजपकडे होते. यानुसार प्रवीण प्रभावळकर यांना उपनगराध्यक्षपदी संधी दिली होती. आता त्यांचा कार्यकाल संपला असून त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नगरसेवक भारत गांधी यांची निवड निश्चित मानली जात आहे. सोमवारी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.