गांधीनगर येथील ६ हजार टन कच-याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:33+5:302021-04-02T04:25:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गांधीनगर, ता. करवीर येथील ६ हजार टन कच-याचे बायो मायनिंगद्वारे व्यवस्थापन करण्याच्या कामास आमदार ...

Management of 6,000 tons of waste at Gandhinagar | गांधीनगर येथील ६ हजार टन कच-याचे व्यवस्थापन

गांधीनगर येथील ६ हजार टन कच-याचे व्यवस्थापन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गांधीनगर, ता. करवीर येथील ६ हजार टन कच-याचे बायो मायनिंगद्वारे व्यवस्थापन करण्याच्या कामास आमदार ऋतुराज पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी प्रारंभ करण्यात आला.

उद्योजकांची सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर फंड) अंतर्गत रिकार्ट इंडिया, दिल्ली व हिंद ॲग्रो अँड केमिकल्स, कोल्हापूर या कंपनीद्वारे हे कचरा बायो-मायनिंगचे काम केले जाणार आहे. यामध्ये ओला व सुक्या कच-याचे वर्गीकरण केले जाणार आहे. यातील सुका कचरा हा सिमेंट कारखान्याला दिला जाणार असून ओला कचरा स्थानिक शेतक-यांना खत निर्मितीसाठी अथवा जमीन भरावासाठी दिला जाणार आहे. कचरा वर्गीकरण आणि वहन करण्याचे काम कंपनीद्वारेच केले जाणार असून या संपूर्ण कामासाठी १५ लाख रुपये खर्च येणार आहे. ग्रामपंचायतीकडून या प्रकल्पासाठी लागणारी वीज पुरवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे गांधीनगर ग्राम पंचायतीचा वर्षानुवर्षे साठलेल्या कच-याचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी जयवंत उगले, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, सरपंच रितू लालवाणी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, कंपनीचे प्रतिनिधी सूरज शिंदे, निरंजन ठमके, कौस्तुभ पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

०१०४२०२१ कोल झेडपी ०२

गांधीनगर येथील कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी करण्यात आला. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी जयवंत उगले, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, सरपंच रितू लालवाणी उपस्थित होत्या.

Web Title: Management of 6,000 tons of waste at Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.