ओंकार पतसंस्थेच्या व्यवस्थापिका निलंबित

By admin | Published: September 8, 2015 11:36 PM2015-09-08T23:36:14+5:302015-09-08T23:36:14+5:30

आर्थिक घोटाळाप्रकरणी कारवाई

The manager of the Omkar Credit Society suspended | ओंकार पतसंस्थेच्या व्यवस्थापिका निलंबित

ओंकार पतसंस्थेच्या व्यवस्थापिका निलंबित

Next

देवरुख : देवरुख शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ओंकार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याला जबाबदार असलेल्या व्यवस्थापिका वासंती अनिल निकम यांच्यावर संचालक मंडळाने ठराव करुन निलंबनाची कारवाई केली आहे.निलंबनाच्या ठरावाचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. ओंकार पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यामुळे देवरुख शहरात एकच खळबळ माजली होती. याचवेळी संचालक मंडळाची धावाधाव सुरु झाली होती. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार लेखापरीक्षण करुन घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आणि २८ आॅगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक गैरव्यवहार झाल्याची कबुली देण्यात आली. या साऱ्या घोटाळ्याला व्यवस्थापिका वासंती निकम दोषी असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, घोटाळा संचालक मंडळाच्या निदर्शनास येताच २४ आॅगस्टपासून व्यवस्थापिका निकम या पतसंस्थेत हजरच राहू शकल्या नाहीत म्हणून सद्यस्थितीत संचालक मंडळाच्या ठरावानुसार पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापक पदावरून ३ सप्टेंबर २०१५पासून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र देऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पत्रामध्ये संचालक मंडळाने म्हटले आहे की, ओंकार पतसंस्थेत व्यवस्थापिका म्हणून सेवेमध्ये कार्यरत असताना वेगवेगळ्या दिवशी अगर तारखांना बऱ्याच रकमांची अफरातफर केल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारची अफरातफर करताना खोट्या नोंदी, खोदी कागदपत्र, तसेच सॉफ्टवेअरमधील पासवर्डचासुद्धा त्यासाठी बेकायदेशीर वापर करुन हा गैरव्यवहार केला असल्याचे दिसत आहे. याबरोबरच पतसंस्थेचा गैरमार्गाने तोटा करीत संचालक मंडळ व अध्यक्ष यांनी याबाबतीत व्यवस्थापिका म्हणून आपल्याकडे चौकशी केली असता समर्पक उत्तरे अगर स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत. मात्र, यावेळी काही संचालकांसमोर व अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यासमोर गैरव्यवहाराबाबतची कबुली दर्शविली आहे आणि जिल्हा सत्रन्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करुन अल्प मुदतीचे संरक्षण घेतल्याचे संचालक मंडळाच्या निदर्शनास आले.
या गैरव्यवहाराबाबत संचालक मंडळाकडून तपासकाम सुरु असून, सर्व कागदपत्रांची शहानिशा व पडताळणी करण्याचे काम सुरु आहे. लेखा परीक्षणानंतरच नकली रक्कम स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

संचालक मंडळाने ठेवला ठपका.
लेखापरीक्षणानंतर आर्थिक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब.
पासवर्डचाही गैरवापर.

Web Title: The manager of the Omkar Credit Society suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.