अन् बँकेच्या व्यवस्थापकाला आयुक्तांनी खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:08 PM2021-04-16T19:08:13+5:302021-04-16T19:10:38+5:30
CoronaVirus Banking Kolhapur : दसरा चौकातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारात सोशल डिस्टन्सिंग न पाळता ग्राहकांनी गर्दी केली होती. यादरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे या आपल्या वाहनातून जात होत्या. त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तत्काळ थांबून बँकेच्या दारात गेल्या आणि त्यांनी व्यवस्थापकास बाहेर बोलावून ग्राहकांची व्यवस्था नीट न केल्याबद्दल चांगलेच सुनावले.
कोल्हापूर : दसरा चौकातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारात सोशल डिस्टन्सिंग न पाळता ग्राहकांनी गर्दी केली होती. यादरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे या आपल्या वाहनातून जात होत्या. त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तत्काळ थांबून बँकेच्या दारात गेल्या आणि त्यांनी व्यवस्थापकास बाहेर बोलावून ग्राहकांची व्यवस्था नीट न केल्याबद्दल चांगलेच सुनावले.
शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे कामानिमित्त आपल्या वाहनातून दसरा चौकातून स्टेशन रोडकडे जात होत्या. यादरम्यान एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारात ग्राहकांची गर्दी झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यानी वाहन चालकांस तत्काळ वाहन थांबवण्यास सांगितले. त्या थेट उतरून त्या बँकेच्या दारात गेल्या. त्यांचे मागोमाग आलेल्या त्यांचे अंगरक्षकाने आत जाऊन बँकेच्या व्यवस्थापकांना बाहेर आयुक्त मॅडम बोलवत असल्याची सांगितले. तत्काळ व्यवस्थापक बाहेर आले.
आयुक्त बलकवडे यांनी ग्राहक म्हणून आलेल्या महिला व ज्येष्ठांना दारात ताटकळत करू नका. त्यांची आत मध्ये सोय करा. दिव्यांग ग्राहक असेल तर त्यांची तंत्र व्यवस्था करा. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते की नाही हे पाहण्यासाठी ही सुरक्षारक्षकही दिसत याची त्यांनी व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिले आणि ही कार्यवाही तत्काळ करा. अशा सूचना देऊन त्या निघून गेल्या. कोरोना वाढत्या पार्श्वभूमीवर अत्यंत दक्षपणे आपले कर्तव्य बजावत आयुक्त बलकवडे यांनी आदर्श प्रशासकाचा एक उत्तम नमुना कोल्हापूरकरांच्या पुढे ठेवला. या त्यांच्या सरप्राईज व्हीजिटची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर सर्वत्र फिरत होती.