मंडलिक कारखान्याला मिळाले खुद्दतोडीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:31+5:302021-04-01T04:24:31+5:30

दत्ता पाटील म्हाकवे : कोरोनाच्या महामारीमुळे यंदा बीडकडील अनेक ऊसतोड मजुरांनी ऊसतोडणीकडे पाठ फिरवली. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण होऊन ...

The Mandlik factory got the strength to break itself | मंडलिक कारखान्याला मिळाले खुद्दतोडीचे बळ

मंडलिक कारखान्याला मिळाले खुद्दतोडीचे बळ

Next

दत्ता पाटील

म्हाकवे : कोरोनाच्या महामारीमुळे यंदा बीडकडील अनेक ऊसतोड मजुरांनी ऊसतोडणीकडे पाठ फिरवली. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण होऊन यंदा गळीत हंगामात ऊसतोडीचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. मात्र, सदाशिवराव मंडलिक कारखान्याने आपल्याच कार्यक्षेत्रातील वाहनधारक व शेतकऱ्यांना खुद्दतोडीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत तब्बल २०१ वाहनधारकांच्या मदतीने युवा शेतकऱ्यांनीच कोयता हातात घेतला.

मंडलिक कारखान्यानेही याला पाठबळ देत दर पंधरवड्याला कमिशनसह मजुरीचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केले. प्रतिटन ३२५ रुपयांप्रमाणे चार महिन्यांत १ कोटी ८५ लाख रुपये मजुरीपोटी देऊ केले आहेत.

या कारखान्याकडे स्वयंस्फूर्तीने ऊसतोड करत असलेले वाहनधारक असे-बैलगाडी (१९), छकडी (५), ट्रक (१४), डबल व दिडके ट्रॅक्टर (७२), छकडी ट्रॅक्टर(१०६) मंडलिक कारखान्याने यंदा गाळप क्षमता वाढविली होती. त्यामुळे खुद्द तोडीमुळे या कारखान्याला हातभार लागला. त्यामुळे साडेपाच लाख मे. टनांपर्यंत गाळप करणे सहज शक्य झाले.

दरम्यान, काही वेळेला मोठे प्रसंग अनेक धडे देऊन जातात, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोरोनाने स्वच्छता, स्वयंशिस्तीबरोबरच श्रमाचे धडे दिले आहेत.

कोट...

ऊसतोडणी टोळीच्या कंत्राटदारांकडून वाहनधारकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे या फसवणुकीवरही खुद्दतोड आणि स्थानिक मजुरांमुळे आळा बसणार आहे.

‘आता यापुढेही जिल्ह्याबाहेरील ऊसतोड मजूर येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ऊसतोड करणे, तसेच टोळी करणे हितावह ठरणारे आहे. यातून त्यांनाही आर्थिक लाभ होणार आहे.

एन. वाय. पाटील कार्यकारी संचालक, सदा साखर

Web Title: The Mandlik factory got the strength to break itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.