साखर उताऱ्यात मंडलिक; तर गाळपात जवाहर आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:55+5:302020-12-23T04:21:55+5:30
म्हाकवे : यंदा अतिवृष्टीमुळे साखर उताऱ्यात घट होईल असा अंदाज वर्तविला जात होता. तसेच ऊसतोड मंजुरांच्या ...
म्हाकवे : यंदा अतिवृष्टीमुळे साखर उताऱ्यात घट होईल असा अंदाज वर्तविला जात होता. तसेच ऊसतोड मंजुरांच्या कमतरतेमुळे गाळपावरही परिणाम होण्याची शक्यता होती. तरीही कारखानदारांनी परिस्थितीवर मात करीत कारखान्यांचे गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू ठेवले आहेत. गत दीड महिन्यात सरासरी ११.७७ टक्के साखर उतारा घेत सदाशिवराव मंडलिक कारखान्याने आघाडी घेतली आहे, तर हुपरी येथील जवाहर ५ लाख ८६ हजार ५१० मेट्रिक टन गाळप करीत पुढे राहिला आहे. आजचा साखर उतारा व कंसात सरासरी उतारा टक्के असा मंडलिक १२.७२,(११.७७), कुंभी-कासारी- १२.४० (११.५८), तात्यासाहेब कोरे-वारणा- १२.७१(११.४३), भोगावती-११.३३(११.४०), जवाहर( हुपरी)-१२.४०(११.३६), बिद्री-१२.४२(११.३३), श्री दत्त शिरोळ-११.६९(११.५), डी.वाय.पाटील-११.८५(११.०३), शरद नरंदे-११.९९(१०.८०), उदयसिंह गायकवाड-१२.७१(११.००), आसुर्ले-पोर्ले(दालमिया)-११.११(१०.९८), छत्रपती शाहू कागल-११.८६(१०.७४)
तर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत गाळपात आघाडी घेतलेले कारखाने असे, जवाहर-हुपरी-(५,८६,५१०), श्री दत्त शिरोळ - (३,९४,६२०), आसुर्लेपोर्ले- दालमिया (३,९२,९३०), छत्रपती शाहू कागल (३,४३,३२५), तात्यासाहेब कोरे-वारणा-(३२७४००), सरसेनापती संताजी (३०३१७०) दरम्यान, सर्वच कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. मात्र, मजूर कमी आले आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना खुद्द तोड करून ऊस पाठवावा लागत आहे.