मांगेवाडी-आकनूर रस्ता थेट पाईपलाईनमुळे खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:38 AM2020-12-13T04:38:18+5:302020-12-13T04:38:18+5:30

सरवडे : सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून मांगेवाडी ते आकनूर पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण ...

Mangewadi-Aknur road damaged due to direct pipeline | मांगेवाडी-आकनूर रस्ता थेट पाईपलाईनमुळे खराब

मांगेवाडी-आकनूर रस्ता थेट पाईपलाईनमुळे खराब

Next

सरवडे : सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून मांगेवाडी ते आकनूर पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण केले होते. मात्र, थेट पाईपलाईनचे काम सुरू झाले आणि पूर्ण रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ता खचला आहे. तरी तो तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी सरपंच यु. डी. पाटील यांनी केली आहे.

‘जीकेसी’ कंपनीने काम करताना हा रस्ता पूर्ण उखडला आहे. दरम्यान, माती केलेल्या या रस्त्याचे आता थेट कारपेट डांबरीकरण अशक्य असून ‘जीकेसी’ने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी होत आहे. दुर्गमानवाड ते निपाणी या आंतरराज्य मार्गाचा भाग असलेल्या मांगेवाडी ते आकनूर रस्ता उद्ध्वस्त अवस्थेत होता. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे ‘बीबीएम’ पद्धतीने खडीकरण झाले. कारपेट पद्धतीचे डांबरीकरण करण्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रस्त्याचे काम ठप्प झाले होते. गेल्या महिन्यापासून कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईनचे काम करणाऱ्या जीकेसी कंपनीने मांगोली फाटा ते मांगेवाडी दरम्यान अजस्त्र क्रेन आणि पोकलेन मशीनचा वापर करून पाईपलाईनसाठी खुदाई सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी केलेला रस्ता उद्‌ध्वस्त झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाखो रुपये अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत. या रस्त्यावर खुदाईची माती टाकल्यामुळे रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. या रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून कंपनीतर्फे पाणी मारण्याची आवश्यकता आहे. कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्यामुळे प्रवाशीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. ............... चौकट

कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्याच्या नुकसानीबाबत कळविले आहे. दहा दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता केला नाही तर या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भरलेल्या डिपॉझीटमधून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करून घेण्यात येतील.

अमित पाटील

शाखा अभियंता सा. बां. राधानगरी

............ फोटो

मांगेवाडी ते आकनूर दरम्यान खराब झालेला रस्ता.

Web Title: Mangewadi-Aknur road damaged due to direct pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.