आंबेओहोळचा घोळ : (पूर्वाध)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:59+5:302021-03-17T04:23:59+5:30

२२ वर्षांनी पूर्णत्वाकडे : २९ कोटींचा प्रकल्प गेला २२७ कोटींवर राम मगदूम। गडहिंग्लज : उत्तूर व कडगाव परिसरातील कोरडवाहू ...

Mango mixture: (Purvadh) | आंबेओहोळचा घोळ : (पूर्वाध)

आंबेओहोळचा घोळ : (पूर्वाध)

Next

२२ वर्षांनी पूर्णत्वाकडे : २९ कोटींचा प्रकल्प गेला २२७ कोटींवर

राम मगदूम। गडहिंग्लज : उत्तूर व कडगाव परिसरातील कोरडवाहू शेती पाण्याखाली यावी आणि त्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून आंबेओहोळ नाल्यावर मध्यम प्रकल्प बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. तब्बल २२ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाच्या पाण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

धरणाच्या साठ्यातून आणि रोटेशन पद्धतीने सोडण्यात येणारे धरणातील पाणी उतरवून ते जीरवणे दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या ७ बंधाऱ्यात साठवून ते खासगी उपसाद्वारे शेतीला उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या धरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून ७ पैकी ६ बंधाऱ्यांची कामेही गतीने सुरू आहेत. त्यासाठी पावणेपाच कोटी रुपये खर्ची पडणार आहेत. १९९८ मध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु, निधीअभावी मंजुरीनंतर दोन वर्षांनी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानंतरदेखील निधीची कमतरता, धरणस्थळ आणि लाभक्षेत्रातील पर्यायी जमिनीच्या संपादनातील अडथळे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या कारणामुळे तब्बल २२ वर्षे हा प्रकल्प रखडला. त्यामुळे सरकार आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. म्हणूनच प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी दोघांनीही आता सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे.

(पूर्वाध:) -----------------------

* बाधित गावे (७) - आर्दाळ, हालेवाडी, वडकशिवाले, महागोंड, होन्याळी, करपेवाडी व उत्तूर

-----------------------

* लाभक्षेत्रातील गावे

आजरा तालुका (११) -आर्दाळ, पेंढारवाडी, उत्तूर, मुमेवाडी, करपेवाडी, चव्हाणवाडी, होन्याळी, महागोंड, महागोंडवाडी, हालेवाडी व वडकशिवाले. गडहिंग्लज तालुका (११) - दगडी शिप्पूर, करंबळी, अत्याळ, बेळगुंदी, गिजवणे, लिंगनूर काानूल, कडगाव, बेकनाळ, जखेवाडी, गडहिंग्लज, वडरगे. -----------------------

* दृष्टिक्षेपात प्रकल्प

- प्रकल्पस्थळ - आर्दाळ (ता. आजरा)

- प्रशासकीय मान्यता - १६ ऑक्टोबर १९९८-प्रकल्पाची मूळ किंमत-२९ कोटी ३१ लाख

- प्रत्यक्ष कामाला सुरुवात-२९ मार्च, २००१-सुधारित प्रशासकीय मान्यता-४ फेब्रुवारी २०१९- प्रकल्पाची सुधारित किंमत-२२७ कोटी ५४ लाख.

- पाणीसाठ्याची क्षमता-१.२३९ अ.घ.फू.-सिंचनाखाली येणारी जमीन-६३५९ हेक्टर (गडहिंग्लज तालुका-२६१५ हेक्टर, आजरा तालुका-१३१० हेक्टर

-----------------------

* फेब्रुवारी - २०२१ अखेर प्रकल्पावर झालेला खर्च

- धरण बांधकाम - ५५ कोटी ७० लाख

- भू-संपादन व पुनर्वसन - ११९ कोटी ९४ लाख

- एकूण - १७५ कोटी ६४ लाख

-----------------------

फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे साकारण्यात येत असलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाच्या घळभरणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

क्रमांक : १६०३२०२१-गड-०१

Web Title: Mango mixture: (Purvadh)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.