कोडोलीच्या सरपंचपदी मनीषा पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:14+5:302021-02-26T04:34:14+5:30
कोडोली : कोडोलीच्या सरपंचपदी मनीषा संग्राम पाटील यांची तर उपसरपंचपदी निखिल निशिकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
कोडोली : कोडोलीच्या सरपंचपदी मनीषा संग्राम पाटील यांची तर उपसरपंचपदी निखिल निशिकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सभागृहात गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी अभिजीत पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य असून, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, कॉँग्रेसचे अमरसिंह पाटील व डॉ. जयंत पाटील यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढविली होती.
कोरे -पाटील गटाचे १५ सदस्य तर २ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. सरपंचपद हे सर्वसाधारण स्त्रीकरिता आरक्षित होते. दोन्ही पदांसाठी एकल अर्ज भरण्यात आला होता. त्यामुळे अध्यासी अधिकारी यांनी त्यांची निवड करण्यात येत असल्याचे घोषित केले. यावेळी जि.प.चे माजी सभापती अमरसिंह पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पाटील, सर्वोदय सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण कुलकर्णी, यशवंत शिक्षण समूहाचे डॉ. जयंत पाटील, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, प्रमोद कोरे यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य व ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम, तलाठी अनिल पोवार आदी उपस्थित होते.