तब्बल ६१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:23+5:302021-05-11T04:26:23+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ६१ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ६१ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नवे ९९८ नवे रुग्ण आढळले असून ११८९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मृत्युदर खाली आणण्यामध्ये अजूनही आरोग्य विभागाला यश आलेले नाही. मृतांतील ६१ पैकी १२ जण इतर जिल्ह्यांतील व राज्यांतील आहेत.
सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक २५२ रुग्ण कोल्हापूर शहरात नोंदविण्यात आले आहेत. त्याखालोखाल करवीर तालुक्यात १२८, हातकणंगले तालुक्यात १२२, तर शिरोळ तालुक्यात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजरा तालुक्यात आठ, गडहिंग्लज तालुक्यात सात, राधानगरी तालुक्यात पाच, शाहूवाडी तालुक्यात केवळ चार रुग्ण आढळल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे गेल्यावर्षीपासून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या २ हजार ७३१ इतकी झाली.
चौकट
मृतांची आकडेवारी
कोल्हापूर शहर १२
शिवाजी पेठ ४, नर्सिंग कॉलेज रिंग रोड, राजारामपुरी, टिंबर मार्केट २, विक्रमनगर, कदमवाडी, बाबुजमाल, साळोखेनगर.
इचलकरंजी ६
मणेरमळाजवळ, पाटील मळा, कारंडे मळा, शहापूर २, इचलकरंजी
कागल ५
कागल, मैाजे सांगाव, सुरूपली, गोरंबे, कसबा सांगाव
शिरोळ ५
जयसिंगपूर, निमशिरगाव, हारोळी २, नांदणी
गडहिंग्लज ५
मुत्नाळ, खणदाळ, दुगुणवाडी, हरळी खुर्द, कौलगे
हातकणंगले ४
रुकडी, हेर्ले, काडाप्पा मळा कबनूर, पेठवडगाव
पन्हाळा ३
माले, यवलूज, बहिरेवाडी
करवीर ३
उचगाव २, वाकरे
शाहूवाडी २
कांटे, मलकापूर
राधानगरी २
राशिवडे, गावठाण राधानगरी
भुदरगड १
वेसर्डे
इतर जिल्हे
विटा (ता. खानापूर), नरवाड (ता. मिरज), वांगी (ता. कडेगांव), पखाले (ता. मंगळवेढा), राजापूर (जि. रत्नागिरी).
सातजण बेळगाव जिल्ह्यातील..
मृतांमध्ये शेजारच्या बेळगाव जिल्ह्यातील सातजणांचा समावेश आहे. व्हन्याळी हुक्केरी (ता. चिक्कोडी), राशिंग (ता. हुक्केरी), संंकेश्वर, निपाणी, विजापूर, हुक्केरी, वाडेहाळ निपाणी या गावातील प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
बापरे..४६ जण पन्नाशीच्या आतील..
मृत्यूमधील ४६ रुग्ण हे वयाच्या पन्नाशीच्या आतील आहेत. एकूण मृत्यूशी हे प्रमाण ७५ टक्क्यापर्यंत जाते. त्याची वर्गवारी अशी :
९० वरील : ०२
८० वरील : ०७
७० वरील : १०
६० वरील : १४
५० वरील : १८
४० वरील : ०७
३० वरील : ०३