ठाकरे गटातील अनेकजण शिंदेसोबत येण्यास तयार; शिवसेनेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांचा दावा
By समीर देशपांडे | Published: April 3, 2024 12:10 PM2024-04-03T12:10:45+5:302024-04-03T12:10:57+5:30
भाजपच्या एका नेत्यांने विरोधी मत मांडले म्हणजे ते पक्षाचे मत नाही, ‘हातकणंगले’च्या विजयासाठी महायुती सज्ज
कोल्हापूर : गेले काही दिवस मी धैर्यशील माने यांना माहिती नसताना हातकणंगले मतदारसंघात फिरत आहे. त्यांनी कमी कालावधीत चांगले काम केले आहे. या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत, त्यातील काहीजण मला भेटूनही गेलेत असा दावा शिवसेनेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी केला आहे. ते बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, स्थानिक नेत्यांना न भेटता मी मतदारसंघाचा आढावा घेतला असून तसा अहवाल कोअर कमिटीला दिला आहे. संजय शिरसाट यांनी त्यांचे विधान बदलले आहे. धैर्यशील माने यांची एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. भाजपच्या एका नेत्यांने विरोधी मत मांडले म्हणजे ते पक्षाचे मत नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. माने यांच्या कार्यपध्दतीमधील उणिवा सांगितल्यानंतर यामध्ये यापुढे दुरूस्ती होईल असे त्यांनी सांगितले.