Kolhapur- शिक्षणाचा परीघ: कागलचा शैक्षणिक स्तर उंचावला, अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग अन् उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:23 IST2025-01-31T19:23:06+5:302025-01-31T19:23:33+5:30

महाविद्यालयीन शिक्षणात मुली ७० टक्के तर मुले फक्त ३० टक्के : बारावीनंतर मुले गेली कुठे?

Many innovative experiments and activities were implemented in the educational sphere of Kagal taluka kolhapur | Kolhapur- शिक्षणाचा परीघ: कागलचा शैक्षणिक स्तर उंचावला, अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग अन् उपक्रम

संग्रहित छाया

जे. एस. शेख

कागल : कागल तालुक्यातील शैक्षणिक परिघात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग आणि उपक्रम राबविण्यात आले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांशी स्पर्धा करण्याइतपत सक्षम बनल्या आहेत. यामुळे या शाळांमधील पट वाढला नसला तरी तो स्थिर आहे. आता दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याने हा परिघ आणखीनच उंचाविणार आहे.

अनुदानित विद्यालयांमध्ये घटत चाललेली विद्यार्थी संख्या चिंताजनक आहे. याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण चांगले आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र जवळपास हे प्रमाण मुले ३० टक्के तर मुली ७० टक्के असे आहे. ही संख्या पाहता उच्च शिक्षण सोडून ही मुले गेली कुठे ? असा प्रश्न कागल तालुक्यात समोर आला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा डिजिटल आहेत. तीन शाळा फ्युच्युरिस्टिक वर्ग असणाऱ्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही फुटेज असून अशी कामगिरी करणारा कागल तालुका जिल्ह्यात एकमेव ठरला आहे

यांचे राहिले योगदान

१९६० मध्ये नव महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार निपाणी येथील देवचंदजी शहा यांनी महाराष्ट्राच्या हद्दीत म्हणजे कागल तालुक्यात पहिले महाविद्यालय सुरू केले. याच्यामागे सीमा भागातील मराठी भाषिकांना उच्च शिक्षण मिळावे ही तळमळ होती. तालुक्यात बॅ. बाळासाहेब खर्डेकर, दौलतराव निकम, एम. आर. देसाई, देवचंद शहा, वाय. डी. माने, सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, मंत्री हसन मुश्रीफ, संजयबाबा घाटगे इत्यादींनी शैक्षणिक योगदान दिले आहे.

दृष्टिक्षेपात शैक्षणिक सोय :
०५- वरिष्ठ महाविद्यालये
६३१५ - एकूण विद्यार्थी संख्या

  • केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय - ०१ 
  • शिक्षणशास्त्र महाविद्यालय-०१ 
  • अध्यापक विद्यालय - ०१ 
  • शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय -०१ 
  • शासकीय होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय - ०१ 
  • विधी महाविद्यालय - ०१ 
  • औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय - ०१
  • औषध निर्माणशास्त्र विद्यालय- ०१ 
  • नर्सिंग महाविद्यालय - ०२ 
  • नर्सिंग कॉलेज - ०१ 
  • कृषी विद्यालय - ०१ 
  • पशुसंवर्धन व व्यवस्थापन विद्यालय - ०१


शाळांची संख्या -२४७ :

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा - ७९
  • प्राथमिक शाळा- १४०
  • इंग्रजी माध्यम शाळा - २८ 
  • उच्च माध्यमिक शाळा - १० 
  • व्होकेशनल कॉलेज- ०४ 
  • आयटीआय - शासकीय - ०१ 
  • आयटीआय खासगी- ०४ 
  • कौशल्य विकास शिक्षण संस्था- २ 
  • प्राथमिक उर्दू शाळा - ०४ 
  • उर्दू विद्यालय ०१ 
  • सी.बी.एस.ई शाळा- ०२ 
  • मूकबधिर, कर्णबधिर विशेष शाळा - ०२ 
  • १ ली ते १२ वी विद्यार्थी संख्या एकूण - ४८,२६०

प्राथमिक शाळा, ते विविध महाविद्यालयांपर्यंत सर्व शिक्षणाचे सरकारीकरण झाले आहे. विद्यार्थ्यांना काय हवे? याचा विचार सरकारी चौकटीत केला जात नाही. उलट खासगी शाळा व अकॅडमीमधून विद्यार्थ्यांना काय आहे हे पाहून त्या पद्धतीने शैक्षणिक यंत्रणा उभी केली जात आहे. म्हणून सर्व सरकारी व अनुदानित शाळांनी विद्यार्थीभिमुख उपक्रमशील राबवून आणि उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने काम केले पाहिजे. अन्यथा त्यांना कोणीही 'बंद' करावे लागणार नाही. ते आपोआप काळाप्रमाणे नामशेष होतील. - डॉ. प्रवीण चौगुले - कॅम्पस डायरेक्टर- डी. आर. माने महाविद्यालय, कागल
 

Web Title: Many innovative experiments and activities were implemented in the educational sphere of Kagal taluka kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.