चक्क अधिकाऱ्यांची गाडीच रोखली, कोल्हापूर महापालिकेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:12 PM2019-01-03T16:12:05+5:302019-01-03T16:14:15+5:30
रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेले किरणा मालाचे दुकान तोडून रस्ता मोकळा करा, अशी तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे अतिक्रमीत पत्राचे शेड महापालिका विभागीय कार्यालयाने तोडल्याबद्दल संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने गुरुवारी चक्क उपशहर अभियंता एस. के. माने यांची गाडी रोखली. महापालिका चौकात गाडीच्या आडवे झोपल्याने त्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकातर्फे बाजूला करण्यात आले.
कोल्हापूर : रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेले किरणा मालाचे दुकान तोडून रस्ता मोकळा करा, अशी तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे अतिक्रमीत पत्राचे शेड महापालिका विभागीय कार्यालयाने तोडल्याबद्दल संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने गुरुवारी चक्क उपशहर अभियंता एस. के. माने यांची गाडी रोखली. महापालिका चौकात गाडीच्या आडवे झोपल्याने त्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकातर्फे बाजूला करण्यात आले.
लक्षतिर्थ वसाहत येथील साई गल्लीत राहणाऱ्या तानाजी दिनकर वास्कर यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जयसिंग गणपती घाटगे यांनी रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्या जागेत किराणा मालाचे दुकान बांधले होते. गेल्या वर्षी त्याबद्दल वास्कर यांनी महापालिकेकडे रितसर तक्रार अर्ज केला होता.
त्यानुसार किराणा मालाचे दुकान तोडण्यात आले. परंतु काही महिन्यांनी पुन्हा त्याच जागेवर घाटगे यांनी दुकान उभारले होते. दरम्यानच्या काळात वास्कर यांनीही त्यांच्या समाईक जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी ते अतिक्रमण काढून टाकले.
त्यामुळे संतप्त झालेल्या वास्कर यांनी गुरुवारी महापालिकेत उपशहर अभियंता एस. के. माने यांच्याकडे माझे पत्र्याचे शेड का तोडले अशी विचारणा केली. बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात आले आहे, तुम्हाला तक्रार करायची असेल तर लेखी करा, असे माने यांनी वास्करना बजावले आणि ते गाडीत बसले.
परंतू त्याने समाधान न झाल्याने वास्कर यांनी त्यांची गाडी अडविली. चक्क ते गाडीच्या आडवेच झाले. शेवटी सुरक्षा रक्षकांना बोलावून त्यांना बाजूला केले. आणि अधिकाºयांच्या गाड्या महापालिका चौकातून बाहेर पडल्या.