आरक्षणासाठी मराठा समाज हक्कदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:32+5:302021-06-02T04:19:32+5:30
रुकडी माणगाव : आरक्षणासाठी मराठा समाज हक्कदार असून, आरक्षणाशिवाय मराठा समाजातील सामान्य व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ...
रुकडी माणगाव
: आरक्षणासाठी मराठा समाज हक्कदार असून, आरक्षणाशिवाय मराठा समाजातील सामान्य व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले ते माणगाव, ता. हातकणंगले येथे वैयक्तिक भेटीकरिता आले असता ही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मराठा समाज प्रामुख्याने शेती व्यवसाय करतो. वर्षानुवर्षे हा व्यवसाय तोट्याचा असल्याने समाजाची सांपत्तिक स्थिती वाईट झाली आहे.
यामुळे तरुणांची प्रगती होणार नसून, पर्यायाने समाजाची प्रगती होणार नाही.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता २0११ साली मी लोकसभेत हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर हळूहळू या विषयाला वाचा फुटत गेली. महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिले असताना सुप्रीम कोर्ट हे आरक्षण का नाकारत आहे, हे कळत नाही. एकीकडे तामिळनाडूसारख्या राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले असताना हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यास निकाल लागण्यास पंधरा-वीस वर्षे लागतात आणि महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासंबधी कोणीतरी याचिका दाखल करतो, त्याला तत्काळ स्टे लागतो, याचे गौडबंगाल कळत नाही. मग सुप्रीम कोर्टही दुजाभाव का करते. केंद्र सरकारचा हा छुपा डाव कळत नसून, मोदी सरकारने या विषयावर उघडपणे चर्चा केली पाहिजे. घटनेत आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे.
चौकट
दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी हे माणगाव येथे वैयक्तिक भेटीकरिता आल्याची बातमी गावात पसरताच योगायोगाने त्यांचा वाढदिवस देखील उत्साही कार्यकर्त्यांनी साजरा केला. शेट्टी हे सहसा वाढदिवस साजरा करत नाहीत; पण आज तरुण कार्यकर्त्यांच्या हट्टापायी वाढदिवस केक कापून साजरा केला.