आई भवानी गोंधळाला ये, शिंदे-फडणवीस-पवारांना बुद्धी दे; मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात जागर
By सचिन भोसले | Published: December 7, 2023 05:34 PM2023-12-07T17:34:22+5:302023-12-07T17:35:40+5:30
कोल्हापूर : गोंधळाला याव भवानी गोंधळाला याव, शिंदे, फडणवीस , पवारांना बुद्धी देण्यात तु यावं, हिवाळी अधिवेशनात गोंधळाला यावं, ...
कोल्हापूर : गोंधळाला याव भवानी गोंधळाला याव, शिंदे, फडणवीस , पवारांना बुद्धी देण्यात तु यावं, हिवाळी अधिवेशनात गोंधळाला यावं, मराठा आरक्षणचा गोंधळ घालतोय गोंधळाला यावं असा जागर सकल मराठा समाजाच्यावतीने ऐतिहासिक दसरा चौकात घालण्यात आला. जागराच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत चर्चा व्हावी. या प्रश्नासाठी जादा काळ भवनात सरकारने वेळ द्यावा. यावर चर्चअंती आरक्षणावर ठोस निर्णय व्हावा. या मागणीसाठी कोल्हापूरातील सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवार सकाळी ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने जागर (गोंधळ) घालण्यात आला. हा गोंधळ युवराज धुमाळ (गोंधळी), अंकुश गोंधळी, रतन सुर्यवंशी (गोंधळी), सोमनाथ धुमाळ, शाहीर दिलीप सावंत यांनी घातला.
विशेषत: मराठा आमदार , खासदारांनी तरी अधिवेशनात गोंधळाला याव आणि तोंड उघडून आरक्षणासंबधी चर्चा तरी करावी. असे लक्षवेधी बोल मराठा आरक्षणाचा जागर घालण्यात आला. यावेळी सकल मराठाचे शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, उदय लाड, विजयराव देवणे, सुभाष जाधव, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, शैलजा भोसले, संयोगिता जाधव, काका जाधव, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.