आरक्षणासाठी कोल्हापुरातील मराठा समाज नेटाने लढा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:02+5:302021-05-15T04:24:02+5:30
अन्यथा, आमदार-खासदारांना फिरू देणार नाही मराठा आरक्षणाबाबत आमदार, खासदारांनी योग्य आणि सकारात्मक भूमिका घ्यावी; अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार ...
अन्यथा, आमदार-खासदारांना फिरू देणार नाही
मराठा आरक्षणाबाबत आमदार, खासदारांनी योग्य आणि सकारात्मक भूमिका घ्यावी; अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यांच्या घरासभोवती वेढा घालून आंदोलन केले जाईल, असे सुजीत चव्हाण यांनी सांगितले. मराठा समाज अन्याय विरोधी संघर्ष समितीची पुढील बैठक लवकरच राजारामपुरीमध्ये घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो (१४०५२०२१-कोल-शिवाजीपेठ बैठक) : कोल्हापुरात शुक्रवारी मराठा आरक्षणाबाबतच्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी शिवाजी तरुण मंडळ तथा निमंत्रक मराठा समाज अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत सुजीत चव्हाण यांनी काही सूचना केल्या. यावेळी शेजारी डावीकडून किसन कल्याणकर, राजू सावंत, बाबा महाडिक, सुरेश जरग, बाबा इंदुलकर, रविकिरण इंगवले, निवास साळोखे, महेश जाधव, अजित राऊत, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)