मराठा समाजाला पदोन्नतीत डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:41 AM2017-08-02T00:41:59+5:302017-08-02T00:41:59+5:30

Maratha community promoted to be promoted | मराठा समाजाला पदोन्नतीत डावलले

मराठा समाजाला पदोन्नतीत डावलले

Next
ठळक मुद्देमराठा समाजाचे शिष्टमंडळ व विद्यापीठाच्या बिंदूनामावली समितीची बैठक
ोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध अधिकारी पदाच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मराठा समाजातील कर्मचाºयांना डावलल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केला. या प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. विद्यापीठातील या पद्दोनतीच्या प्रकरणांबाबत अपुरी माहिती, असमाधानकारक उत्तरे देणाºया विद्यापीठ प्रशासनाच्या प्रतिनिधींना या शिष्टमंडळाने धारेवर धरले.विद्यापीठात मंगळवारी दुपारी सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ व विद्यापीठाच्या बिंदूनामावली समितीची बैठक झाली. यावेळी उपकुलसचिव पदांची पदोन्नती आणि भरती प्रक्रिया ही शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून झाली आहे. खुल्या प्रवर्गासह मराठा समाजाला डावलण्यात आले आहे, असा आरोप या शिष्टमंडळाने केला. आमचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही. मात्र, राज्यघटना, कायद्याने जे खुल्या प्रवर्गाला दिले आहे ते मिळाले पाहिजे. नोकरभरती आणि पदोन्नतीमध्ये ५२ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये, अशी तरतूद राज्यघटनेनुसार करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने १८ आॅक्टोबर १९९७ च्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सरळसेवा भरती आणि पदोन्नतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी ३२ टक्क्यांहून जास्त केली आहे. त्यामुळे पदोन्नती, भरती प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून बिंदूनामावली समितीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील शिष्टमंडळाने दिला. यावर प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी याबाबतीत ४ आणि १२ आॅगस्टला मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि बिंदूनामावली समितीची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, बिंदूनामावली समितीचे अध्यक्ष प्रकाश राऊत, उपकुलसचिव पी. एस. सोयम, अ‍ॅड. सतीश नलवडे, दुर्गेश लिंग्रस, संग्राम निंबाळकर, बाबा पार्टे, राजू जाधव, रूपाली पाटील, वैशाली महाडिक, नितीन पाटील, कमलाकर जगदाळे, उमेश पोवार, आदी उपस्थित होते.बिंदूनामावली समितीची ४ व १२ आॅगस्टला बैठकया भरती प्रक्रियेची शहानिशा करण्यासाठी पूर्वी १७ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर समितीत अ‍ॅड. सतीश नलावडे, सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळातील प्रा. जयंत पाटील, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, फत्तेसिंग सावंत यांचा समावेश करण्यात आला. या समितीची बैठक ४ आणि १२ आॅगस्टला होणार आहे.विद्यापीठाचे प्रतिनिधी निरुत्तरपदोन्नती, भरती प्रक्रियेबाबत विद्यापीठाचे प्रतिनिधी या बैठकीत माहिती देत होते. मात्र, ते देत असलेली माहिती अपुरी असल्याचे लक्षात येताच ‘आधी पूर्ण माहिती घ्या आणि मग बोला’, अशा शब्दांत सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने सुनावले. शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर विद्यापीठाचे प्रतिनिधी निरुत्तर झाले.

Web Title: Maratha community promoted to be promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.