Maratha Reservation : शासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:54 PM2018-08-02T16:54:13+5:302018-08-02T17:01:08+5:30

मराठा आरक्षण मागणीसाठी कोल्हापूरात दसरा चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठींबा वाढत आहे. या प्रश्नासाठी बलीदान दिलेल्या शाहिदांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया बचत करावे असे आवाहन या ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरुन गुरुवारी केले.

Maratha Reservation Government 9th 'Ultimate', Decide, Parties responsible for the decision | Maratha Reservation : शासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदार

Maratha Reservation : शासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदार

ठळक मुद्देशासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदारमराठा आरक्षण मागणीसाठी ठिय्या आंदोलनास वाढता पाठींबा

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी कोल्हापूरात दसरा चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठींबा वाढत आहे. या प्रश्नासाठी बलीदान दिलेल्या शाहिदांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया बचत करावे असे आवाहन या ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरुन गुरुवारी केले. दरम्यान, शासनाने हा प्रश्न तातडीने निकाली काढावा अन्यथा ९ आॅगष्ट रोजी महाराष्ट्र बंद कालावधीत घडणाऱ्या संभाव्या परिस्थितीस शासनच जबाबदार राहील असाही इशारा देण्यात आला.

कोल्हापूरातील दसरा चौकात गेले नऊ दिवस सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरु आहे. अनेक नेत्यांनी या व्यासपीठावर येऊन मराठा आरक्षणाला पाटबळ दिले. आंदोलनाला विवीध पक्ष, संघटनांचा पाठींबा वाढत आहे. गावांगावांतून युवक भगव्या टोप्या परिधान करुन भगवे झेंडे फडफडत दुचाकी रॅलीने दसरा चौकात येऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. दिवसभर ‘जय भवानी-जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे’ असे नारा दसरा चौकात घुमत आहे.

गुरुवारी आंदोलनस्थळी नेत्यांनी भाषणे करताना शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा यासाठी ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’ देण्यात आला. ९ आॅगष्ट रोजी अगर त्यानंतरच्या संभाव्या परिस्थितीस शासनच जबाबदार राहील असाही इशारा दिला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रत बलीदान दिलेल्या चौघांच्या नातेवाईकांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनाही अर्थसहाय्य करावे अशीही मागणी काहींनी भाषणातून केली.

राजकिय बोक्यांना बाजूला सारा : धैयशील माने

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, आरक्षणाची धग वाढताना शासनाने वेळीच तोडगा काढवा अन्यथा त्याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. ९ आॅगष्ट रोजी महाराष्ट्र बंद वेळीही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यावेळी घडणाऱ्या घटनेस शासनच जबाबदार राहील असा इशारा देत माने म्हणाले, आम्हाला राजकिय आरक्षण नको, अन्यथा आतापर्यत झालेले मराठा समाजातील मुख्यमंत्रीच ते आरक्षण लाटतील, अशा राजकिय बोक्यांना प्रथम बाजूला सारा. त्यामुळे आम्हाला फक्त शैक्षणिक व नोकरीतच आरक्षण द्यावे.

आरक्षणातील शहिदांसाठी १ रुपये बचत करा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलीदान दिलेल्या चौघांच्या नातेवाईकांची अवस्था दयनीय झाली असून त्यांना अर्थसहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक आंदोलनस्थळी एक बॉक्स ठेवून त्यात प्रत्येक आंदोलकाने किमान १ रुपये टाकावा, त्यातून जमा होणारी रक्कम ही सर्वासमक्ष खोलून ती बलीदान झालेल्या शहिदांच्या नातेवाईकांना द्यावी असाही प्रस्ताव माजी आमदार सुरेश साळोखे यांनी मांडला.

गावातील भगव्या रॅली दसरा चौकात

मुडशिंगी, मोरेवाडी, दऱ्याचे वडगाव येथील युवकांनी दुचाकीवरुन रॅली काढून दसरा चौकात येऊन आंदोलन केले. पाचगाव येथील नागरीकांनीही पदयात्रा काढत दसरा चौकात येऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला. त्यामुळे गावागावातील भगवे जथ्ये कोल्हापूरात दाखल होत होते.

काँग्रेसच्या नगरसेवकांचाही ठिय्या

महापालिकेतील काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनीही गुरुवारी दसरा चौकात ठिय्या आंदोलनात सहभाग दर्शविला. यामध्ये गटनेते शारंगधर देशमुख, राहूल माने, संजय मोहिते, भूपाल शेटे, प्रविण केसरकर, इंद्रजीत बोंद्रे, सचीन चव्हाण यांच्यासह अशकीन आजरेकर, दुर्वास कदम आदी सहभागी झाले.

आंदोलकांची आडवणूक नाही: पोलीस अधीक्षक

सेनापती कापशी येथून पायी कोल्हापूरात येणाऱ्या आंदोलकांची कोगनोळी नाक्याजवळ पोलिसांनी आडवणूक केल्याची माहिती दसरा चौकात मिळाल्याने आंदोलक संतप्त झाले. पण पायी येणाऱ्या आंदोलकांची कर्नाटक पोलिसांच्या तावडीतून आपण सुटका केली. त्यांना सुखरुप कागलपर्यत आणले असून ते शुक्रवारी सकाळी दसरा चौकात पोहचतील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी व्यासपीठावर भाषणातूनच केल्याने अनेकांनी सुस्कार सोडला.

जनता दल, हिंदू एकतांचाही पाठींबा

जनता दल (सेक्युलर) या पक्षानेही आंदोलनाला पाठींबा दिला. महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी, शासनाने तातडीने मराठा आरक्षणाचा त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा भविष्यातील अस्थिर परिस्थितीस शासनच जबाबदार राहील असाही इशारा दिला.

आंदोलनात विठ्ठलराव खोराटे, वसंतराव पाटील, विठ्ठलराव मुसळे, संभाजीराव पाटील, एस.डी.पाटील, बबन पाटील, शरद पाटील आदी सहभागी झाले. तर हिंदू एकता आंदोलनतर्फे आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, लाला गायकवाड, हिंदूराव शेळके, शांतारावम इंगवले, जयदिप शेळके, आण्णा पोतदार आदी सहभागी होते.

विवीध समाज, संघटनेचा पाठींबा

वीरशैव कक्कय (डोहर) समाज व चर्मकार समाज कृती समिती (दुर्वास कदम, निरंजन कदम, संतोष भिसूरे), समस्त जैन समाज (श्री लक्ष्मीसेन भट्टारक महाराज), माजी सैनिक संघटना कागल, जंगम पुरोहित सेवा संस्था (संतोष स्वामी), तुळजाभवानी गृहनिर्माण संस्था,आदी संघटनांनी पाठींबा व्यक्त केला.

 

Web Title: Maratha Reservation Government 9th 'Ultimate', Decide, Parties responsible for the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.