Kolhapur- मराठा आरक्षण: हुपरीत 'मराठा क्रांती'च्यावतीने अर्धनग्न आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 03:16 PM2023-09-09T15:16:20+5:302023-09-09T15:17:03+5:30
तानाजी घोरपडे हुपरी : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व ...
तानाजी घोरपडे
हुपरी : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व कुणबी दाखला वंशावळीसाठी निजामशाही पुरावे मागणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज शनिवार, हुपरी (ता. हातकणंगले ) येथे 'मराठा क्रांती'च्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत यापुढेही विविध प्रकारची उग्र स्वरूपाची आंदोलने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जुने बस स्थानक चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला. मराठा समाजाचे आरक्षणाबाबत सुरू असणारे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शासन प्रयत्न करीत असुन एक मराठा काय करू शकतो हे जालना येथील आंदोलनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आंदोलक अर्धनग्न झाले. शांततेच्या मार्गाने सुरू असणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या घटनेचाही यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. तसेच जालना येथील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात विनायक विभूते, जयराम गायकवाड, राजेंद्र पाटील, सात्ताप्पा गायकवाड, सुरज कदम, विशाल चव्हाण, अमर माने, संताजी देसाई, प्रताप जाधव , नितीन काकडे, वैभव लायकर, राजू साळूखे, अमित गायकवाड, धनाजी शिंदे, सूर्यकांत रावण , संभाजी काटकर, बाळासाहेब तांदळे, लखन शेलार, सागर मेथे, बंडा काकडे, नितीन काटकर, सयाजी देसाई आदींनी सहभाग घेतला होता.