कोर्टबाजीत अर्थ नाही, जे आरक्षण देतो म्हणताहेत ते...; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान
By समीर देशपांडे | Published: October 15, 2022 03:15 PM2022-10-15T15:15:32+5:302022-10-15T17:50:58+5:30
भारताची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याच्या काळात सर्वांना बरोबर घेवून जाण्याची गरज आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय कोल्ड स्टोअरेजमध्ये पडला आहे. कोणत्याही कोर्टबाजीत अर्थ नाही. जे आरक्षण देतो म्हणत आहेत ते आपल्यासोबत आहेत का हे पहा. परंतू आता जर आरक्षण मिळाले नाही तर ते कधीच मिळणार नाही हे लक्षात घ्या असा इशारा शाहू छत्रपती दिला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांना चारचाकी वाहन प्रदान समारंभात ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू छत्रपती म्हणाले, आपण आपसात भांडत राहिलो तर मग प्रतिगामी असणाऱ्या सत्तेतील शक्तीकडे लक्ष केंद्रित होते. पुरोगामित्वामध्ये जर महाराष्ट्र मागे पडला तर देशातही तसेच वातावरण होवू शकते. भारताची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याच्या काळात सर्वांना बरोबर घेवून जाण्याची गरज आहे.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार उल्हास पवार, राजेंद्र कोंढरे यांची भाषणे झाली. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.