मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे आज भेटणार राष्ट्रपतींना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:08+5:302021-09-02T04:54:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे आज, गुरुवारी दुपारी साडेचार वाजता राष्ट्रपती रामनाथ ...

Maratha reservation issue Sambhaji Raje will meet the President today | मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे आज भेटणार राष्ट्रपतींना

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे आज भेटणार राष्ट्रपतींना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे आज, गुरुवारी दुपारी साडेचार वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे संभाजीराजे आणि राष्ट्रपतींच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

संभाजीराजे यांनी आपल्यासोबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रत्येकी एका खासदारास निमंत्रित केले आहे. त्यानुसार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे त्यांच्यासोबत राष्ट्रपतींना भेटतील. कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्यामुळे आमदार संग्राम थोपटे हे कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

सुरुवातीपासूनच संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक पुढचा टप्पा म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे.

Web Title: Maratha reservation issue Sambhaji Raje will meet the President today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.