Maratha Reservation : लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:54 PM2018-08-02T12:54:35+5:302018-08-02T13:07:48+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंब्यासाठी निघालेला लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला. कोल्हापूर येथ दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी ता. कागल येथून सुरू झालेला लॉन्गमार्च लिंगनूर कापशी येथे सकाळी साडे दहा वाजता कर्नाटक हद्दीवर पोलिसांनी अडवला.
कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंब्यासाठी निघालेला लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला. कोल्हापूर येथे दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी ता. कागल येथून सुरू झालेला लॉन्गमार्च लिंगनूर कापशी येथे सकाळी साडे दहा वाजता कर्नाटक हद्दीवर पोलिसांनी अडवला.
आज कर्नाटक बंद असल्याने कर्नाटक पोलिसांनी हद्दीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे परवानगी मिळवण्यासाठी सीमेवरच लोकांनी ठिय्या मांडला. कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांच्या तुकड्या येथे थांबून आहेत.
निपाणी मार्गच का निवडायचा ? परवानगी मिळणार का? अन्य मार्गाने जायचे याचा निर्णय न झाल्याने लोक रस्त्यावर वाहतूक सुरू ठेऊन बसून राहिले. शेवटी कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकरल्याने संतप्त तरूणांनी कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्र हद्दीतून निघून जाण्यास सांगितले.
दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ,पोलिस उप अधिक्षक सुरज गुरव, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांना खाजगी बसने कर्नाटक हद्दीतून नेवून कागल जवळ महाराष्ट्र हद्दीत सोडण्याचा पर्याय काढण्यात आला.