Maratha reservation-मराठा आरक्षण संघर्ष समितीचा बंद स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:54 PM2020-10-09T16:54:58+5:302020-10-09T16:57:05+5:30

Maratha Reservation, mumbai, meeting, kolhapurnews, Uddhav Thackeray मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने घोषणा केलेला शनिवारचा महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.

Maratha reservation- Maratha Reservation Struggle Committee closed | Maratha reservation-मराठा आरक्षण संघर्ष समितीचा बंद स्थगित

Maratha reservation-मराठा आरक्षण संघर्ष समितीचा बंद स्थगित

Next
ठळक मुद्देमराठा आरक्षण संघर्ष समितीचा बंद स्थगितमुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य

 कोल्हापूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने घोषणा केलेला शनिवारचा महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांबाबत संघर्ष समितीच्या पुढाकाराने कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद झाली होती. राज्य सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा समितीने दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बंद स्थगित केल्याची घोषणा समितीने केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. अद्याप मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पोलीस भरतीसह सगळीच भरती प्रक्रिया स्थगित करावी, ईडब्लूएस आरक्षण हवे, या मागण्या प्रलंबित आहेत. याबाबतही त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने बंद स्थगित केल्याचे संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: Maratha reservation- Maratha Reservation Struggle Committee closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.