गावागावांतून भगवे जथ्थे दसरा चौकात मराठा आरक्षण आंदोलन : दलित समाजाचाही पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:42 AM2018-08-01T00:42:21+5:302018-08-01T00:43:02+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, मंगळवारीही ग्रामीण भागातून दुचाकी रॅलीचे अनेक ‘भगवे जथ्थे’ दसरा चौकातील आंदोलनात येऊन सामील झाले.

Maratha Reservation Movement in Dasara Chowk, Saffron Saath in Gavagavan: Support for Dalit Society | गावागावांतून भगवे जथ्थे दसरा चौकात मराठा आरक्षण आंदोलन : दलित समाजाचाही पाठिंबा

गावागावांतून भगवे जथ्थे दसरा चौकात मराठा आरक्षण आंदोलन : दलित समाजाचाही पाठिंबा

Next

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, मंगळवारीही ग्रामीण भागातून दुचाकी रॅलीचे अनेक ‘भगवे जथ्थे’ दसरा चौकातील आंदोलनात येऊन सामील झाले. दरम्यान, आंदोलनात फूट पाडण्याच्या उद्देशाने संयोजकांना आलेल्या धमक्यांवर काही नेत्यांनी आपल्या भाषणांतून आगपाखड केली. मराठा समाज हा धमक्यांना कधीही घाबरत नाही. धमक्या द्याल तर शोधून घरात घुसून मारू, असाही इशारा देण्यात आला. दरम्यान, सकाळी उत्तरेश्वर पेठ आणि संयुक्त पंचगंगा तालीम मंडळाच्या वतीने गंगावेश चौकात मानवी साखळी करून आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंगळवारीही अनेक गावांतून दुचाकी रॅली काढून कोल्हापुरातील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी लोकांनी सहभाग नोंदविला. भगवे झेंडे फडकावत, सळसळत्या रक्ताने ‘जय भवानी - जय शिवाजी’चे नारे देत युवक मोठ्या उत्साहाने आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत होते. मंगळवारीही सुमारे १५ हून अधिक गावांनी तसेच विविध संस्थांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
ठिय्या आंदोलनस्थळी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, उर्वरित महाराष्टÑ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, विश्वासराव देशमुख, मुरगूडचे उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, गणी आजरेकर, शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, वसंतराव मुळीक, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, दगडू कांबळे, फत्तेसिंह सावंत यांच्यासह आदींनी भेट देऊन मराठा आरक्षणाला (पान ३ वर)


धमक्या आणि उत्सुकता
सकल मराठा ठोक मोर्चाचे संयोजक सचिन तोडकर आणि दिलीप देसाई यांनी आपल्या भाषणातून, आपल्याला इचलकरंजी, हातकणंगले या भागांतून सोमवारी (दि. ३०) सायंकाळपासून फोनवर धमक्या येत असल्याचे सांगितले. या धमक्यांद्वारे एकसंध मराठा मोर्चात फूट पाडण्याचा काहींचा डाव असल्याची जाणीव अनेकांनी भाषणात बोलून दाखविली; पण मराठा समाज अशा भ्याड धमक्यांपुढे वाकणारा, घाबरणारा नसून धमक्या द्याल तर घरात घुसून मारू, असा इशारा यावेळी अनेकांनी दिला. या धमक्यांबाबत पोलीस खात्याकडे आपण रीतसर तक्रार केल्याचेही देसाई यांनी यावेळी भाषणातून सांगितले.
दलित समाजही खांद्याला खांदा लावून
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आंबेडकरवादी समाज, पक्ष, संघटना जनआंदोलन यांनी या दलित समाजाने पाठिंबा दर्शविला. यावेळी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,’ अशा घोषणा देत ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आले. यामध्ये प्रा. शहाजी कांबळे, प्रा. विश्वासराव देशमुख, उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, बाळासाहेब भोसले, सखाराम कामत, नंदकुमार गोंधळी, भाऊसाहेब काळे, रमेश पाचगावकर, सोमनाथ घोडेराव, अब्बास शेख, बाजीराव गायकवाड, प्रकाश अंगरखे, जयसिंग जाधव, पांडुरंग कांबळे, बाजीराव कांबळे आदींचा समावेश होता.

मराठा आरक्षणासाठी मंगळवारी कोल्हापुरातील मराठा क्रांती संघटनेच्यावतीने श्री अंबाबाईला साकडे घालण्यात आले. गोेंधळी आणि मागे हातात भगवे झेंडे घेतलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘आरक्षण आमच्या हक्काचं,’ असं म्हणत शिवाजी पेठेपासून महाद्वारापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Maratha Reservation Movement in Dasara Chowk, Saffron Saath in Gavagavan: Support for Dalit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.