मराठा आरक्षणप्रश्नी बंदला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:45 AM2018-07-25T00:45:27+5:302018-07-25T00:45:35+5:30

Maratha reservation question closed | मराठा आरक्षणप्रश्नी बंदला गालबोट

मराठा आरक्षणप्रश्नी बंदला गालबोट

googlenewsNext

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनावेळी औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाचा निषेधही करण्यात आला. बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना अनेक ठिकाणी एसटीबसेवर दगडफेकीचे प्रकार घडले. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. बंदमुळे अनेक मार्गावरील एसटी वाहतूक विस्कळीत झाली.
नूल, पाटणे फाट्यावर
कडकडीत बंद
गडहिंग्लज : गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत राज्यव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नूल, महागाव, कोवाड, हलकर्णी व पाटणे फाट्यावर कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शासनाचा निषेध नोंदवून मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, आजरा येथील व्यापाऱ्यांनी सकाळी काही वेळ व्यवहार बंद ठेवले.
नूल येथे कडकडीत बंद
नूल : येथील बसस्टँडवर सर्वपक्षीय सभा झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा निषेध नोंदवून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. येथील शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.
महागाव येथे कडकडीत बंद
महागाव : मराठा क्रांती मोर्चाच्या येथील कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार बंद ठेवून ‘बंद’ला पाठिंबा देण्यात आला.
कोवाडला कडकडीत बंद
कोवाड : मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी येथील व्यापारी आणि ग्रामस्थांनी उर्त्स्फूतपणे सर्व व्यवहार बंद ठेवून राज्यव्यापी बंदला पाठिंबा दिला. हलकर्णी फाटा आणि पाटणे फाटा येथील व्यापाºयांनीही उर्त्स्फूतपणे बंद पाळून राज्यव्यापी बंदला पाठिंबा दिला.
आजºयात व्यापाºयांचा पाठिंबा
आजरा : राज्यव्यापी बंदच्या आवाहनानुसार येथील व्यापाºयांनी सकाळी काही काळ आपले व्यवहार बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, आदींनी बंदचे आवाहन केले.
कोल्हापूर-गारगोटी
महामार्गावर रास्ता रोको
गारगोटी : मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी गारगोटी शहरासह तालुक्यातील मडिलगे बुद्रुक, कूर, कडगाव, पिंपळगाव, पाटगाव, आदी प्रमुख गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला. मराठा क्रांती संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, तालुका संघटक सतीश जाधव यांनी गारगोटी ‘बंद’साठी आवाहन केले होते. गारगोटी बंद करण्यासाठी मराठा क्रांती संघटनेने व शहरातील नागरिकांनी गारगोटी शहरातून रॅली काढली. हुतात्मा चौकातून मराठा समाजातील कार्यकर्ते एस.टी. स्टँडकडे गेले व गारगोटी आगारप्रमुखांना एस.टी.सेवा बंद करण्याची विनंती केली. यावेळी आगारप्रमुखांनी एस.टी. सेवा बंद केली. सुमारे तीन तास पिसे पेट्रोलपंपानजीक चक्काजाम करण्यात आले. आंदोलनात शिवराज देसाई, मराठा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, संघटक सतीश जाधव, तालुका उपप्रमुख तुकाराम देसाई, संदीपराज देसाई, आदी उपस्थित होते.

कोल्हापूर-सांगली मार्गावर दोन बसेस फोडल्या
जयसिंगपूर : मराठा आरक्षणावरून सकल मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या शिरोळ तालुका बंदला प्रतिसाद मिळाला. मात्र, या आंदोलनाचे पडसाद शिरोळ तालुक्यात उमटले. यामध्ये तमदलगे येथे दोन, तर जयसिंगपूर येथे एका एस.टी.वर अज्ञातांनी दगडफेक करून नुकसान केले. दगडफेकीत एस.टी.चे ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे येणाºया सांगोला आगाराच्या एस.टी.(एमएच ११ बीसी ९४५१) वर अज्ञातांनी दगडफेक केली. न्यायालयासमोर असणाºया बस थांब्यावर दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी अडीचच्या सुमारास तमदलगे येथे कुडाळ आगाराची एस.टी. (एमएच १४ बीटी ४१६०) व कोल्हापूर आगाराची एस.टी. (एमएच १४ बीटी ३१०१) वर अज्ञातांनी दगडफेक करून दर्शनीबाजूच्या काचा फुटल्याने एस.टी.चे नुकसान झाले.

Web Title: Maratha reservation question closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.