मराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडून फसवणूक: श्रीमंत कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:54 PM2018-12-07T14:54:04+5:302018-12-07T14:56:36+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण हे समाजाची फसवणूक करणार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. हे आरक्षण परिपूर्ण नसून यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यानेच या विरोधात याचिका दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण हे समाजाची फसवणूक करणार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. हे आरक्षण परिपूर्ण नसून यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यानेच या विरोधात याचिका दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने केलेली शिफारस ही संविधानीक आहे. त्याचबरोबर ५० टक्केच्या वर आरक्षण टिकू शकत नाही असे म्हणणे असंवैधानिक आहे. कारण घटनेत असे कोठेही म्हंटलेले नाही.
उलट सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात अशा प्रकारे मर्यादा घातलेली आहे. सरकारने हे आरक्षण केंद्रामध्येही देऊन त्या ठिकाणी सवलती मिळाल्यास ते परिपूर्ण होईल.
यावेळी हिंदुराव हुजरे-पाटील, शिवाजी खोत, विजय पाटील, चेतन पाटील आदी उपस्थित होते.