सूचना पाळा समन्वयकांच्या मराठा क्रांती मोर्चा : मावळ्यांना बैठकीत सूचना; ठरविलेल्या आचारसंहितेचे पालन करा

By admin | Published: October 4, 2016 01:22 AM2016-10-04T01:22:19+5:302016-10-04T01:27:53+5:30

महाराष्ट्रात नाही ते कोल्हापुरात घडणार सतेज पाटील यांचा विश्वास : मराठा क्रांती मोर्चा तयारीसाठी बैठक

Maratha Revolution Maratha Revolutionary Coordinator: Notice in meeting in Maval; Follow the set code of conduct | सूचना पाळा समन्वयकांच्या मराठा क्रांती मोर्चा : मावळ्यांना बैठकीत सूचना; ठरविलेल्या आचारसंहितेचे पालन करा

सूचना पाळा समन्वयकांच्या मराठा क्रांती मोर्चा : मावळ्यांना बैठकीत सूचना; ठरविलेल्या आचारसंहितेचे पालन करा

Next


कोल्हापूरचा मोर्चा राज्याला दिशादर्शक ठरेल--इतिहास संशोधक इंद्रजित सावंत
आमचाही पाठिंबा....

कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चा हा मराठा समाजासाठी असल्याने मोर्चा मार्गावर राजकीय नेत्यांनी कोणतेही आदेश दिले तरीही मावळा व रणरागिणींनी फक्त ठरवून दिलेल्या संयोजन समितीच्या समन्वयकांच्याच सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी मार्गावर नियोजनासाठी मावळा व रणरागिणींची पहिली बैठक सोमवारी सायंकाळी शिवाजी मंदिरमधील प्रधान कार्यालयात झाली. यावेळी स्वयंसेवक असणाऱ्या मावळा व रणरागिणींची संख्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. यावेळी मावळे व रणरागिणींना ठरवून दिलेल्या आचारसंहिता, नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मोर्चा कशासाठी निघत आहे, मोर्चातील मागण्यांवरही सखोलपणे चर्चा करण्यात आली. मोर्चातील मागण्या काय हे राम कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी संदीप पाटील, साक्षी पन्हाळकर, उमेश पोवार, धनंजय पाटील आदींनी अत्यंत तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी स्वप्निल पार्टे, अवधूत अपराध, युवराज साळोखे, पीयूश चव्हाण, रूपेश पाटील, अमरसिंह पाटील, सुप्रिया दळवी, शिवाजी सासने, कोमल मिठारी, प्राजक्ता बागल आदी उपस्थित होते.
१४, १५ला शहरातील मंगल कार्यालये रात्रं-दिवस सुरू
मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्णातून उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. त्यामुळे १४ व १५ आॅक्टोबरला शहरातील सर्व मंगल कार्यालये सर्वांना राहता येईल यासाठी खुली राहणार आहेत. त्यामुळे
कोणाचीही गैरसोय होणार नसल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात
आले.


कोल्हापूर : सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, शैक्षणिक, आदी क्षेत्रांत मराठा समाजावर सातत्याने हल्ले करून त्याचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. शेती, सैन्यात मराठा अधिक आहेत. याद्वारे कष्ट, त्याग करूनदेखील केवळ मराठा आहे, म्हणून सवलती मिळत नसल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत अस्तित्वाची लढाई म्हणून क्रांती मूकमोर्चाच्या माध्यमातून मराठा बांधव रस्त्यावर उतरले असून, आता मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नसल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले.
इतिहास संशोधक सावंत म्हणाले, महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून मराठ्यांच्या अस्मितेवर हल्ला सुरू आहे. टप्प्याटप्प्यांनी त्यामध्ये वाढ होत गेली. मराठ्यांकडे जोपर्यंत जमीन होती, तोपर्यंत ठीक होते; पण, मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत परप्रांतीय व्यापारी वृत्तीने मराठ्यांकडील जमीन काढून घेतली. त्यातूनही खच्चीकरण झाले. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांत अगदी ठरवून मराठ्यांचे खच्चीकरण सुरू झाले. हे कुठेतरी थांबविले पाहिजे, या भूमिकेतून सजग असलेला मराठा समाज संघटित झाला आहे. त्याचा परिपाक म्हणजे हे मराठा क्रांती मूक महामोर्चे आहेत. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांनी म्हटले होते की, बहुजन मराठ्यांची पिढी शिकली तर ती क्रांती घडवून आणेल. त्याची सुरुवात या क्रांती मोर्चाच्या माध्यमातून झाली आहे. मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहेत. त्यांच्या चारित्र्यावर हल्ले केले गेले आहेत. लेखणीच्या माध्यमातून असा हल्ला करणाऱ्यांचा, मराठ्यांना चिडविणाऱ्यांचा गौरव केल्याचाही मराठा समाजाला राग आहे. शेती, सैन्यात मराठा अधिक आहेत. याद्वारे कष्ट, त्याग करूनदेखील केवळ मराठा आहे म्हणून सवलती मिळत नाहीत. अन्य लोकांची सुबत्ता लक्षात येत आहे. कष्ट, त्याग करूनही मराठ्यांना अस्तित्व कायम राखण्यासाठी झटावे लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी मराठा समाज संघटित झाला आहे. मराठ्यांचा इतिहास गौरवशाली आहे. तो दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा ताकदीने प्रतिकार करून हा प्रयत्न थोपविला जाईल. आमच्या भूमीत, घरात येऊन आम्हांला रोखण्याचा प्रयत्न आता येथे मराठा समाज यशस्वी होऊ देणार नाही. महाराष्ट्रात क्रांती मोर्चे सुरू होऊन एक महिना होत आला आहे. अजूनही राज्य सरकारला याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. मराठ्यांनी चंद्र-सूर्याची मागणी केलेली नाही. मराठा समाजाला आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्यासह शेतीमालासंदर्भातील असलेल्या मागण्या सहज आणि सोप्या स्वरूपातील आहेत. मूक मोर्चा काढून मराठे शांत बसतील असे सरकारला वाटत असेल; पण तसे होणार नाही. मराठे आता गप्प बसणार नाहीत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याबाबत कार्यवाही करावी. गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात मराठा गोलमेज परिषद झाली. यातून मराठ्यांच्या एकतेची सुरुवात झाली. या परिषदेतील मागण्या सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्रभर फिरल्या. त्यांतील मागण्या घेऊन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी मराठ्यांना दिशा देण्याचे काम केले. करवीरनगरीतून मराठ्यांच्या एकतेची सुरुवात झाल्याने निश्चितपणे येथून निघणारा १५ आॅक्टोबरचा मोर्चा महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल, अशी मला खात्री आहे.


टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघ
जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत मराठा मोर्चास पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव हरिभाई पटेल यांनी मोर्चास पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास जयंती पटेल व काकासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. या मोर्चात इचलकरंजी, करवीर, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, कागल, मलकापूर, कागल येथील व्यापारी सहभागी होणार आहेत. या मोर्चात सॉ मिलधारक, बांबू व्यापारी, रंधा मशीन, मार्केटमधील टेम्पो चालक, हमाल, आदींनी व्यवसाय बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष देशमुख यांनी केले.
कोल्हापूर दिगंबर जैन समाज
कोल्हापूर दिगंबर जैन समाजातर्फे अध्यक्ष पद्माकर कापसे यांनी पत्रक काढून मराठा मूक मोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रकाद्वारे अ‍ॅड. महावीर बिंदगे, प्रकाश उपाध्ये, चंद्रकांत वाकळे, अभय बहिरशेट, सुनील पाटील, संजय आडके, रवींद्र चौगुले, अ‍ॅड. राजेंद्र पाटील-आळतेकर, अभिषेक पाटील, राजू उपाध्ये, अनुप भिवटे, अ‍ॅड. किरण महाजन, बाळासाहेब निल्ले, संजय चौगुले, अमृत वणकुद्रे, अ‍ॅड. अरुण बिंदगे, अभय भिवटे, अभिषेक मिठारी, सुशांत पाटील, राजेंद्र देसाई, प्रकाश डोर्ले, ओमकार डोर्ले, विजय बोगार, अशोक रोटे, श्रीकांत रोकडे, बाबूराव दंताळ, जयराम रांगोळे, शशिकांत वणकुद्रे, अरविंद कस्तुरे, आदी शंभरहून समाजबांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना
येथील अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेतर्फे शाहूनगर येथे बैठक आयोजित केली होती. यामध्ये अध्यक्ष माजी नगरसेवक जनार्दन पोवार यांनी मराठा मूक मोर्चास पाठिंबा देण्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी समाज बांधवांतर्फे टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा जाहीर केला. केवळ पाठिंबा न देता सहभागी होण्याची ग्वाही दिली. यावेळी भीमराव नलवडे, अनिल मोहिते, रामजी पोवार, सुभाष साळोखे, मल्लाप्पा वडर, संजय शिंगाडे, बाबूराव दिंडे, राजू सांगावकर, मुरलीधर पोवार, दिलीप नलवडे, विलास नलवडे, मारुती शिंगाडे, दिनकर भोसले, कमलाकर पोवार, परसू जाधव, शंकर चौगुले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
थ्री व्हीलर अ‍ॅटो रिक्षा मेकॅनिकल असोसिएशन
कोल्हापूर : येथील जिल्हा थ्री व्हीलर अ‍ॅटो रिक्षा मेकॅनिकल असोसिएशनची मराठा मूक मोर्चास पाठिंबा देण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत मोर्चासाठी येणाऱ्या अ‍ॅटो रिक्षा व दुचाकी वाहने जर नादुरुस्त झाली तर ती मोफत दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सेवा १५ आॅक्टोबरला मोफत देण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्ष सुनील पाटील यांनी ठराव मांडला. बैठकीस अन्य सदस्य व सभासद उपस्थित होते.
रंकाळा तालीम मंडळ
शिवाजी पेठ येथील रंकाळा तालीम मंडळाच्यावतीने परिसरातील सर्व मंडळांची बैठक झाली. या बैठकीत सर्व मंडळांनी मूक मोर्चास पाठिंबा जाहीर केला. मोर्चादिवशी सकाळी ८ वाजल्यापासून जावळाच्या बाल गणेश भक्त मंडळातर्फे अल्पोपहार वाटप केला जाणार आहे. पाठिंबा जाहीर केलेल्या मंडळांमध्ये रंकाळा मार्केट स्पोर्टस् (बिल्डर गु्रप), यु. के. गु्रप, जयभवानी स्पोर्टस्, भवानी मित्रमंडळ, सम्राट अशोक मित्रमंडळ, धुण्याची चावी फ्रेंडस सर्कल, महादेव तरुण मंडळ, उमेश कांदेकर युवा मंच, रंकाळा टॉवर प्रेमी गु्रप, लेटस गु्रप, क्रांती तरुण मंडळ, मंडळ बॉईज, दत्ता गु्रप, अजिंक्य तरुण मंडळ (मंडप गु्रप), आण्णा गु्रप, रंकाळा टॉवर रिक्षा मित्रमंडळ, रंकाळा तालीम फुटबॉल टीम, धुण्याची चावी महादेव भक्त मंडळ यांचा समावेश आहे.

Web Title: Maratha Revolution Maratha Revolutionary Coordinator: Notice in meeting in Maval; Follow the set code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.