मराठा आरक्षणाच्या लढ्यात हातात हात घालून लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:48+5:302021-05-26T04:25:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय आता महत्त्वाचा असून, दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत गैरसमजुतीतून काही वक्तव्य झाली आहेत; ...

Maratha will fight hand in hand in the fight for reservation | मराठा आरक्षणाच्या लढ्यात हातात हात घालून लढणार

मराठा आरक्षणाच्या लढ्यात हातात हात घालून लढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय आता महत्त्वाचा असून, दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत गैरसमजुतीतून काही वक्तव्य झाली आहेत; मात्र आपापसातील गैरसमज दूर करून यापुढे हातात हात घालून आरक्षणाचा लढा पुढे नेण्याचा निर्धार भाजपचे माजी महानगर अध्यक्ष महेश जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी बैठकीत केला.

मराठा आरक्षणाच्या लढ्याबाबत मंगळवारी शिवाजी मंदिर येथे महेश जाधव, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, सुजीत चव्हाण, सुरेश जरग, दिलीप सावंत यांची बैठक झाली. महेश जाधव म्हणाले, मराठा समाजावरील अन्याय आता सहन करायचा नाही. यासाठी यापुढे आपापसात काही समज, गैरसमज असतील तर ते बाजूला ठेवून समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढे जाऊया.

आज मराठा समाजाची बैठक

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केल्याची माहिती शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने देण्यात आली.

फोटो ओळी :

मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी दिलीप सावंत, सुजीत चव्हाण, इंद्रजित सावंत, महेश जाधव, सुरेश जरग, दिलीप देसाई, योगेश साळोखे उपस्थित होते. (फोटो-२५०५२०२१-कोल-मराठा समाज)

Web Title: Maratha will fight hand in hand in the fight for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.